Steam From Mouth: हिवाळ्यात सर्दीत अचानक तोंडातून वाफ का निघतात ? जाणून घ्या, कारण

थंडी येताच तोंडातून अचानक वाफ का बाहेर पडू लागते आणि उन्हाळा येताच ही वाफ कुठे गायब होते.
Steam From Mouth
Steam From MouthSaam Tv

Steam From Mouth : हिवाळा सुरू झाला की आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होतात. हिवाळा सुरु झाला की, आपल्या खाण्यापिण्याबरोबरच आरोग्यावर (Health) परिणाम होत असतो. या काळात सर्दी-खोकला व ताप यासारखे संसर्गजन्य आजार होत असतात. या काळात बरेचदा आपल्याला सर्दी (Cold) झाल्यानंतर आपण तोंडाद्वारे श्वास घेत असतो.

यामध्ये बरेचदा तोंडातून वाफ बाहेर पडते. लहानपणी हा खेळ आपल्यापैकी बरेचजणांनी खेळला असेलच पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, थंडी येताच तोंडातून अचानक वाफ का बाहेर पडू लागते आणि उन्हाळा येताच ही वाफ कुठे गायब होते. जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे कारण सांगणार आहोत

Steam From Mouth
Winter Tips For Kids : वाढत्या थंडीत मुलांची काळजी घ्यायची आहे ? तर, 'या' टिप्स फॉलो करा

1. यामुळे हिवाळ्यात तोंडाद्वारे वाफ बाहेर येते

हिवाळा येताच अचानक वाफ सोडण्यामागे शास्त्रीय कारण आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. पण जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्या आतून कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, काही ऑक्सिजन, आर्गॉन आणि काही ओलावा देखील बाहेर पडतो. हा ओलावा शरीरातून बाहेर पडल्यावर ते वाफेचे रूप घेते.

साध्या शब्दात सांगायचे झाले तर, आपल्याला माहित आहे की मानवी शरीराचे सामान्य तापमान सुमारे 98.6 डिग्री फॅरेनहाइट असते. यामुळेच हिवाळ्यात जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा शरीरात असलेली उष्णता श्वासासोबत बाहेर पडते. शरीरातून बाहेर पडणारी ही गरम हवा बाहेरील थंड वातावरणाला भेटताच तिचे बाष्पीभवन सुरू होते. अशाप्रकारे हिवाळ्यात जेव्हा आपण तोंडातून श्वास सोडतो तेव्हा ते वाफेच्या रूपात दिसून येते.

2. उन्हाळ्यात वाफ का बाहेर पडत नाही ?

आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ही प्रक्रिया उन्हाळ्यातही होते, मग तोंडातून वाफ का बाहेर पडत नाही. यामागेही एक कारण आहे. उन्हाळ्यात आपल्या शरीराचे तापमान आणि बाहेरचे तापमान जवळपास सारखेच असते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्या तोंडातून ओलावा बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या रेणूंची गती ऊर्जा कमी होत नाही, त्यामुळे तो दूर राहतो. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, उन्हाळ्यात ओलावा फक्त वायू अवस्थेत राहतो, ज्यामुळे त्याचे वाफेत किंवा पाण्याच्या थेंबात रूपांतर होत नाही. म्हणजे जिथे शरीराचे आणि बाहेरचे तापमान सारखेच असेल, तिथे तोंडातून वाफ येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com