Stress In Kids : मुलांच्या 'या' सवयी असू शकतात तणावाचे कारण; पालकांनी वेळीच लक्ष द्या

या धावपळीच्या जीवनात तणावाचे शिकार लहान मुले देखील होऊ लागले आहे.
Stress In Kids
Stress In KidsSaam Tv

Stress In Kids : व्यस्त जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती तणाव व नैराश्याशी झुंज देत आहे. या धावपळीच्या जीवनात या परिस्थितीचा शिकार लहान मुले देखील होऊ लागले आहे. कोरोनाच्या महामारीनंतर मुले पुन्हा शाळेत जाऊ लागले आहे. शाळा आणि अभ्यासाचे दडपण असलेल्या मुलांसाठी कोरोनाचा काळ एक भयानक टप्पा घेऊन आला. कोरोनाच्या काळात मुले घरात कोंडून राहिली असताना आता शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर मुलांना त्या वातावरणाशी पुन्हा जुळवून घेण्यात खूप अडचणी येत आहेत.

त्यामुळे मुले तणावाची शिकार होत आहेत. अशा वेळी मुलांच्या आत वाढणारा हा ताण ओळखून तो दूर करणं खूप गरजेचं आहे. कारण ही समस्या योग्य वेळी सोडवली नाही तर पुढे ती गंभीर स्वरूप धारण करू शकते. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या मानसिक आरोग्याबाबत चिंतित असाल आणि तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की तुमचे मूल देखील तणावाचे शिकार आहे की नाही, तर मुलांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांच्या (Symptoms) मदतीने तुम्ही ते तणावाखाली आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता.

Stress In Kids
Bad Habits of Kids : तुमचे मूल वाईट संगतीत आहे ? तर 'या' टिप्सचा वापर करा

1. सतत चिडचिड करणे

डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये राग आणि चीड हे त्यांच्या तणावाखाली असण्याचे मोठे लक्षण आहे. रागामुळे मुलांच्या वागण्यातही खूप बदल झालेला दिसतो. हे एक भितीदायक लक्षण आहे, कारण उपचार न केल्यास राग मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनू शकतो, जो त्याच्या किंवा इतर कोणासाठीही दीर्घकाळ हानीकारक ठरू शकतो.

2. अपूर्ण झोप

झोपेचा त्रास आणि झोपल्यानंतर वारंवार उठणे हे देखील तणावाचे लक्षण असू शकते. जर तुमच्या मुलाची तब्येत पूर्णपणे ठीक असली तरीही ही लक्षणे त्याच्या आत सतत दिसत असतील तर तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

3. नखे कुरतडणे

नखे चावणे ही अनेकांची सवय असते. पण अनेकदा नखे ​​चघळण्याची सवय तणावग्रस्त मुलांमध्येही दिसून येते. जर तुम्हाला अचानक तुमच्या मुलामध्ये ही लक्षणे दिसली तर तुम्ही सावध राहावे.

Stress In Kids
Kids Health : तुमचे मुल देखील नाश्ता करण्यास टाळाटाळ करतंय ? होऊ शकतो मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम

4. पोटदुखी

ओटीपोटात दुखणे हे देखील मुलांमध्ये (Child) तणावाचे प्रमुख लक्षण मानले गेले आहे. चार वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांमध्ये पोटदुखीशी संबंधित कोणताही आजार नसल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. ती सर्व सामान्य आणि निरोगी असतात. अशा स्थितीत तणाव हे यामागचे कारण मानले जात होते.

5. शौच करण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल

तज्ज्ञांच्या मते, तणावामुळे मुलांच्या शौचाच्या सवयींमध्येही बदल झाला आहे. तणावग्रस्त काही मुले टॉयलेटला जाण्यास कचरतात, तर काही अनेक वेळा शौचास जाऊ लागतात. डॉक्टरांच्या मते, जर मूल निरोगी असेल आणि पूर्वीसारखे खात नसेल तर याचे कारण तणाव असू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com