
Stress Problem : काम, कौटुंबिक आणि घरातील कामांमुळे आपल्या मनावर व शरीरावर ताण येऊ शकतो. ताण आल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो.
ताण आल्यामुळे आपण नैराश्याला बळी पडावे लागते. सतत नकारात्मक भावना मनात निर्माण होतात. त्यामुळे आपली सतत चिडचिड होते, राग अनावर होतो व निराशा मनात निर्माण होते.
तणाव आल्यामुळे बहुतेक वेळा आपल्या स्नायूंवर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे आपल्या मान व त्याच्या मागील बाजूस ताणले जाते व तेथे वेदना होऊ लागतात.
या मानसिक व शारीरिक तणावातून मुक्त कसे व्हाल ? हे जाणून घ्या
१. खोलवर श्वास घेणे -
दीर्घ श्वास घेतल्यामुळे ताणलेल्या स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. याचा प्रभाव आपल्या शरीरावर व मनावर पडतो त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. दीर्घ श्वास घेतल्यानंतर मसाज व गरम शॉवर आणि स्ट्रेचिंग करू शकतात. यामुळे आपल्या दिवसभर ताजेतवाने वाटेल.
२. फोन व स्क्रिनचा वापर कमी करा -
दिवसभर फोनचा अधिक वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांना व शरीराला अधिक ताण पडतो. यामुळे झोपेवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो. आपला वेळ घालवण्यासाठी आपण वाचन, चित्रकला, नृत्य आदी छंद जोपासायला हवे. ज्यामुळे आपली तणावाची पातळी कमी होईल.
३. आरोग्यदायी आहार -
आपण आपल्या आहारात आरोग्यदायी (Healthy) पदार्थांचे सेवन केल्यास आपला ताण कमी होण्यास मदत होते. तसेच आपण आहारात साखरेचे प्रमाण कमी करायला हवे त्यामुळे ताण आणखी वाढण्यास मदत होते. आपल्या रोजच्या आहारात प्रथिने, पोषण व फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच अधिक प्रमाणात फळे, बीन्स, नट, मासे आणि बिया खाव्यात. ज्यामुळे आपला ताण कमी होईल.
४. स्वत:ची काळजी -
स्वत:ची काळजी केल्याने तणावामध्ये (Stress) अधिक बदल घडतात. यामुळे तणावाची पातळी बदलते व जीवनाचा दर्जा देखील उंचावतो व आपला मूड देखील सुधारतो. हा तणाव कमी करण्यासाठी आपण स्वत:ला वेळ द्या. वेळेचा योग्य वापर करा.
५. योग्य व्यायाम -
व्यायाम हा आपल्या समस्येवर उपाय नसला तरी तो आपल्या तणावापासून मुक्त होण्यासाठी मदत करु शकतो. तसेच तणावाची पातळी कमी करण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाण्याची गरज नाही. त्यासाठी आपण स्ट्रेचिंगसारखे हलके व्यायाम करु शकता. तसेच सायकलिंग करणे हा देखील उत्तम पर्याय आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.