मानशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर घडवू शकतात

दहावी व बारावी झाल्यानंतर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत गोंधळलेले असतात.
Career option, Career In Psychology, Education tips
Career option, Career In Psychology, Education tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दहावी व बारावी झाल्यानंतर आपल्यापैकी बरेच विद्यार्थी आपल्या शिक्षणाच्या बाबतीत गोंधळलेले असतात. पालकांनी सांगितलेले ऐकायचे, मित्र-मैत्रिणींनी निवडेले करिअर करायचे की, इतर तिसऱ्यांनी दिलेला सल्ला ऐकायचा याबाबत त्यांचा गोंधळ उडालेला असतो.

हे देखील पहा -

करिअरसाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत पण योग्य कोणता हे आपल्या कळत नाही. त्याबाबतीत कळाले तरी दिशा कोणती योग्य आहे याबाबत आपण गोंधळलेले असतो. बरीच मुले करिअर हे मानशास्त्र या विषयातून करण्याचा विचार करत असतात. विषय निवडताना हे लक्षात घेतले पाहिजे की, असे अनेक विषय आहेत ज्याची आपल्या माहिती नसते अशावेळी आपण त्या विषयात पारंगत असणाऱ्या व्यक्तीशी किंवा व्यवसायिक सल्लागाराशी आपण चर्चा करु शकतो. चांगले करिअर निवडण्यासाठी आपल्या दहावीनंतर सुरूवात करायला हवी त्यामुळे आपले पाया अधिक मजबूत होतो व पुढील शिक्षण (Education) घेण्यास सोपे जाते. मानशास्त्रीयमध्ये करिअर (Career) करण्यासाठी त्याविषयी जाणून घ्या.

मानशास्त्रीय हा मानवी व्यवहाराचा व मानसिक प्रक्रियेच्या विविध दुष्टिकोणानातून अभ्यास करता येणारा विषय आहे. यामध्ये आपण आपले भविष्य उत्तमरित्या घडवू शकतो. मानवी धारणा, शिक्षण, भावना आणि परिस्थितींवरील प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी ते वैज्ञानिक पद्धतीपर्यंत याचा अभ्यास केला जाऊ शकतो. तसेच यात क्लिनिकल सायकोलॉजी, इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर, शालेय मानसशास्त्र, फॉरेन्सिक सायकोलॉजी, स्पोर्ट्स सायकोलॉजी, रिहॅबिलिटेशन, कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स याविषयात आपण अभ्यास करु शकतो.

Career option, Career In Psychology, Education tips
Benefits of Walking: वेगाने चालल्यास शरीराला त्याचा फायदा कसा होईल ?

मानशास्त्रीय या अभ्यासासाठी लागणारी पात्रता कोणती ?

१. मानशास्त्रीय या अभ्यासासाठी आपली कोणत्याही क्षेत्रातून बारावी व्हायला हवी. शक्यतो आपण कलाक्षेत्रातून आपली बारावी झाल्यास आपल्याला पुढील शिक्षणांसाठी फायदा होईल.

२. मानशास्त्रामध्ये आपण पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतो.

३. मानशास्त्रातून विशिष्ट क्षेत्रात आपल्याला पदवी घेता येईल.

४. क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये आपल्याला एम.फिल पदवी करता येऊ शकते.

५. मानशास्त्राच्या विशेष क्षेत्रात आपल्याला डॉक्टरची पदवी आपण घेऊ शकतो.

मानशास्त्रीयमध्ये नोकरीच्या संधी -

- क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये आपल्याला सरकारी आणि खाजगी रुग्णालये, एनजीओ, फ्रीलांसरमध्ये परवानाधारक म्हणून काम करता येईल.

- औद्योगिक मानसशास्त्रमध्ये आपल्याला I/O मानसशास्त्रज्ञ, संस्थांमध्ये सल्लागार म्हणून काम करता येईल.

- फॉरेन्सिक मानसशास्त्रमध्ये आपल्याला पोलीस विभाग, गुन्हे शाखा, संरक्षण/लष्कर, कायदा संस्था, तपास ब्युरो इत्यादींमध्ये सल्लागार म्हणून काम करू येऊ शकते.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com