
Overweight Problem : वजन वाढणे ही आताच्या काळातील अगदी सामान्य समस्या आहे. या मागे अनेक कारणे असू शकतात. आपल्या जीवनशैलीत दिवसेंदिवस होत असलेले बदल, आहरात प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वाढता वापर ही यामागची महत्त्वाची कारणे. परंतु बऱ्याचदा लोक वजन वाढीला थायरॉइडचे लक्षण समजतात. पण काय खरंच वाढलेलं वजन थायरॉइडचं लक्षण आहे का? चला जाणून घेऊया
थायरॉइड हा रोग सध्या जाागतिक स्तरावर अतिशय झपाट्याने वाढत आहे. या रोगासंदर्भात जागरुकता पसरावी यासाठी दर वर्षी 25 मे ला 'जागतिक थायरॉइड दिन' साजरा केला जातो. हा रोग कोणत्या ही वयोगटातील व्यक्तीस होऊ शकतो. त्यामुळे या रोगापासून बचाव करण्यासाठी याची लक्षणे (Symptoms) आणि उपाय माहीत असणे गरजेचे आहे.
1. थायरॉइड आणि वजनवाढ
आपल्या शरीरातील थायरॉइड हार्मोन्स मेटाबॉलिझम नियंत्रित करतात. मेटाबॉलिझममध्ये होणाऱ्या समस्यांचा परिणाम आपल्या वजनावर होतो. अंडरएक्टिव थायरॉइड (हायपॉथारॉयडिझम) च्या रुग्णांना वजन वाढीची समस्या असते.
आपल्या थायरॉइड (Thyroid) ग्रंथीमधून स्त्रावणारा हार्मोन्स मेटाबॉलिझमला नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यापासून शरीर उर्जेसाठी अन्नाचा वापर करु शकते. जेव्हा तुमच्या शरीरात थायरॉइड हार्मोन्स कमी प्रमाणात बनतो तेव्हा मेटाबॉलिझम संथ होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही कॅलरीज कमी केल्या नाहीत तर वजन वाढू लागते.
2. वजन कमी होणे
थायरॉइड हा रोग फक्त वजन वाढण्याचेच नाही तर वजन कमी होण्यामागचे ही कारण ठरु शकते. हा रोग एक हायपॉथायरॉइडिझम प्रकार आहे, ज्यात थायरॉइड ग्रंथी अधिक हार्मोन्स रिलीज करु लागते आणि आपले वजन कमी होऊ लागते. त्याच बरोबर हात थरथरने, हृदयाचे ठोके वाढणे, अनियमित होणे हा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे वजन वाढणे आणि कमी होणे ही दोन्ही थायरॉइडची लक्षणे आहेत.
3. थायरॉइडच नाही तर ही देखील ठरु शकतात वजन वाढण्यामागची कारणेः
वजन वाढणे हे थायरॉइडच्या लक्षणांपैकी एक लक्षण असले तरी त्याला थायरॉइडचे कारण देणे अगदी चुकीचे आहे. वजन वाढीची इतरही कारणे असू शकतात आणि त्याची संभाव्यता लक्षात घेऊन योग्य कारणांना समजून घणे आणि योग्य तो उपचार करणे आवश्यक असते. कारण वाढलेले वजन निरोगी शरीराचे लक्षण नाही.
1. आपले वजन तेव्हा वाढते जेव्हा आपण कॅलरीज अधिक प्रमाणात ग्रहण करतो पण, शारीरिक हालचालींच्या माध्यमातून कमी करत नाही.
2. जास्त वजन हे अनुवांशिक ही असू शकते.
3. सततचे आजारपण आणि औषधांच्या अति सेवनामुळे देखील वजन वाढू शकते.
4. तणाव आणि झोपेची कमतरता हे देखील वजनासंबंधीत समस्यांशी जोडले जाते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.