Swine Flu Infection : स्वाइन फ्लूचा वाढत्या संसर्गाचा सामना कसा कराल ? स्वयंपाकघरातील कोणत्या पदार्थांने त्याच्यावर मात करता येईल ?

स्वाइन फ्लूचा संसर्ग कसा रोखाल ?
Swine flu infection , Home remedies
Swine flu infection , Home remedies ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वाइन फ्लूचा वाढता संक्रमण पुन्हा वाढतो. स्वाइन फ्लू हा श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. हा आजार इन्फ्लूएन्झा टाईप- A च्या 'H1N1' विषाणूमुळे हा आजार होतो.

हे देखील पहा -

स्वाइन फ्लू हा आजार हा नाक, घसा आणि फुफ्फसातील पेशींना संक्रमित करतो. या आजाऱ्याच्या संपर्कात आल्याने डोळे, नाक किंवा तोंडावाटे स्वाइन फ्लू पसरु शकतो. एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त रुग्णांमध्ये हा आजार गंभीर वळण घेऊ शकतो. ताप, डोकेदुखी, खोकला, अशक्तपणा, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, थंडी वाजून येणे, घसा खवखवणे ही लक्षणे स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आढळून येतात. आजाराचे संकेत सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखे असले तरी, स्वाइन फ्लूवर उपचार करणे खूप कठीण आहे. स्वाइन फ्लूने प्रभावित झालेल्या लोकांची संख्या खूपच चिंताजनक आहे, स्वाइन फ्लूची औषधे रुग्णांना त्रासदायक ठरत आहेत तेव्हा हे आव्हान समोर येते.

१. लसूण अनेक आरोग्यविषयक समस्या आणि आजारांवर मात करण्यासाठी प्रभावी असल्याने, स्वाईन फ्लूच्या उपचारातही ते फायदेशीर ठरू शकते. लसणात असलेले अॅलिसिन शरीरातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरासाठी चांगले असतात. यातील घटकांमुळे स्वाइन फ्लूच्या सूक्ष्मजंतूवर मात करता येते व रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करते.

Swine flu infection , Home remedies
Health tips : वयाच्या पन्नांशी नंतर कोणते पदार्थ आहारात असायला हवे ? स्त्री व पुरुषांनी निरोगी राहण्यासाठी आहारात हे बदल करा

२. तुळशीला आयुर्वेदात अधिक महत्त्व आहे. तुळशीच्या पाण्याचे सेवन केल्याने घसा आणि फुफ्फुसातील संसर्गजन्य घटक स्पष्ट होण्यास मदत होते. तसेच या आजारात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढली जाते.

३. उलट्या, जुलाब, जास्त लघवी आणि घाम येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी स्वाइन फ्लूने बाधित लोकांना भोगावी लागतात. त्यामुळे या आजाराचा सामना करताना आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकते. हानिकारक विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी आणि आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.

४. हळदीमध्ये (Turmeric) नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आहेत. सर्दी, फ्लू, संक्रमण आणि जखमांवर उपचार करण्यासाठी एक जुना उपाय म्हणून वापरला जातो. कोमट दुधात (Milk) हळदीचे सेवन केल्यास स्वाइन फ्लूच्या संसर्गापासून आपल्याला आराम मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com