Gas Pain Or Heart Attack: छातीत तीव्र वेदना; ह्रदयविकाराचा झटका की आणखी काही?

Symptoms Of Gas Pain And Heart Attack: फास्ट फूडमळे तरुणांमध्ये लठ्ठ्पणा, सुस्ती यासह हृदयविकाराच्या समस्या देखील जाणवतात.
Gas Pain Or Heart Attack
Gas Pain Or Heart AttackSaam TV

Heart Attack News: रोजच्या धावपळीच्या जीवनात नागरिकांना विविध व्याधींचा सामना करावा लागतो. जेवणाच्या वेळा ठरलेल्या नसल्याने अनेकांना अपचन किंवा अॅसिडीटीचा त्रास जाणवतो. सध्याची तरुण पिढी सातत्याने फास्ट फूड खाताना दिसते. फास्ट फूडमळे तरुणांमध्ये लठ्ठ्पणा, सुस्ती यासह हृदयविकाराच्या समस्या देखील जाणवतात. (Latets Marathi News)

दिवसेंदिवस वृद्धांपासून अगदी तरुण वयाच्या मुलांपर्यंत हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्याची जीवनशैली आणि खाद्यपदार्थ यासाठी कारणीभूत आहेत. जास्त खाल्याने अनेकवेळा पोटात गॅसच्या समस्या होतात. हा गॅस कधीकधी छातीतही जातो आणि वेदना जाणवू लागतात. अशात अनेक व्यक्तींना हृदयविकाराने छातीचे दुखणे आणि गॅसमुळे छातीमधील दुखणे यातील फरक समजत नाही. त्यामुळे आज या बातमीतून हा फरक व्यवस्थीत समजून घेऊ.

Gas Pain Or Heart Attack
Constipation : पोटात सारखा गॅस, पोट होत नाही साफ, हे खा आणि २ मिनीटात मोकळे व्हा

गॅसमुळे छातीत दुखण्याची लक्षणे

  • गॅसच्या दुखण्याने छातीत जास्त वेदना होतात. तसेच जळजळ देखील होऊ लागते.

  • जास्त वेळ रिकामे पोट राहिल्याने गॅसची समस्या जाणवते.

  • तसेच गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने देखील पोटात गॅस होतो.

  • यासह चहा, धुम्रपान अशा व्यसनानेही पोट जड होते.

हृदयविकाराने छातीत दुखण्याची लक्षणे

  • हृदयविकाराचा त्रास असेल तेव्हा छातीवर जडपणा अथवा ओझं वाटू लागतं.

  • छातीच्या डाव्या बाजूसच तीव्र वेदना जाणवतात.

  • थंड घाम, चक्कार, श्वास घेण्यास अडनण अशा समस्या यावेळी जाणवतात.

Gas Pain Or Heart Attack
Detox Drink For Weight Loss : सुटलेले पोट येईल नियंत्रणात, वाढलेल्या चरबीपासून होईल सुटका; या डिटॉक्स ड्रिंक्सचे करा नियमित सेवन...

गॅसमुळे होणारा त्रास आणि हृदयविकाराचा त्रास यात फार फरक आहे. गॅस झाल्यावर तो तुमच्या हृदयाच्या फक्त डाव्या बाजूस जाणवतो असे नाही. त्याने छातीत, पोटात दुखू लागते, अचानक पोट फुगते. मात्र हार्टअटॅकमध्ये तुमच्या हृदयावर प्रचंड ताण येतो मोठं ओझं असल्यासारखं जाणवतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com