Baby Care : अशी घ्या उन्हाळ्यात नवजात बालकाची काळजी..!
मुंबई: मे महिना सुरू होताच उष्णतेने कहर करायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांबरोबरच ज्येष्ठांचीही विशेष काळजी (Care) घेण्याची नितांत गरज आहे. विशेषतः मे आणि जूनच्या कडक उन्हापासून मुलांना वाचवणे हे पालकांसाठी खूप कठीण काम आहे. दुसरीकडे मूल नवजात असेल तर उष्णतेचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर व त्वचे (Skin) वर होतो. अशा परिस्थितीत मुलांना उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. (Baby care tips in marathi)
हे देखील पहा -
तसे पाहायला गेले तर लहान मुलं (Child) शारीरिकदृष्ट्या खूप नाजूक असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर व तसेच त्याच्या नाजूक त्वचेवर होतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा प्रयत्न करून तुम्ही मुलांना उष्णतेपासून सुरक्षित ठेवू शकता.
१. उन्हाळ्यात, साधारणपणे १० ते ५ दरम्यान, कडक ऊन असते. अशा वेळी मुलांना चुकूनही बाहेर काढू नका. लहान मुलांची त्वचा फार नाजूक असते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम मुलांच्या त्वचेवर, केसांवर आणि डोळ्यांवर होतो.
२. मुलांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी त्यांना भरपूर पाणी पाजण्याचा प्रयत्न करा कारण पाणी मुलांच्या शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दुसरीकडे, जर तुमचे बाळ सहा महिन्यांपेक्षा कमी असेल, तर त्याला निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी आहार द्या.
३. मुलांना उन्हाळ्यात विविध प्रकारचे फॅब्रिक कपडे घालू देऊ नका. त्यामुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ उठण्याचा धोका असतो. उन्हाळ्यात मुलांनी सुती कपडेच घालावेत. त्यामुळे गरम होणार नाही, तसेच बाहेर जाताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मुलांचे डोके सुती कपड्याने झाकायला विसरू नका.
४. उन्हाळ्यात मुलांची त्वचा पुरळ मुक्त ठेवण्यासाठी सुती लंगोट घालणे अत्यंत चांगले असते. याशिवाय लहान मुलांना पुरळ येण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्वचा कोरडी ठेवण्यासाठी बेबी क्रीम किंवा पावडरची मदत घ्या.
५. उन्हाळ्यात घाम येणे आणि हवा नसल्यामुळे मुलांना घामोळ्या येऊ लागतात. अशा परिस्थितीत मुलांना घामोळ्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना फक्त सुती कपडे घाला. तसेच, घामोळ्या दूर करण्यासाठी बेबी पावडर लावा व तेलाचा वापर शक्यते करू नका.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.