मुलांना स्विमिंग शिकवताना या गोष्टींची काळजी घ्या

मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याव्यतिरिक्त, पोहण्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत.
मुलांना स्विमिंग शिकवताना या गोष्टींची काळजी घ्या
Parenting Tips in marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात, बरेच पालक त्यांच्या मुलांच्या अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या आवडीवर लक्ष केंद्रित करतात. अशावेळी मुलांचे छंद जोपासण्यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी अनेक पालकही मुलांना स्विमिंग शिकवण्याचा आग्रह धरतात. स्विमिंग शिकण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम महिना आहे. पण मुलांना पोहायला लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.

हे देखील पहा -

तसेच पोहणे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्याव्यतिरिक्त, पोहण्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. मात्र, मुलांना स्विमिंग शिकवण्यापूर्वी त्यांच्या आरोग्यापासून ते स्विमिंग पूलपर्यंतच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका.

मुलांना स्विमिंग शिकवताना या गोष्टीकडे लक्ष द्या.

१. मुलांना (Child) स्विमिंग शिकवण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करा. त्यांचे आरोग्य आणि वजन यासंबंधी माहिती घेऊन त्यानंतर डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घ्यायला विसरू नका. तसेच पोहताना प्रथमोपचार पेटी मुलांजवळ नेहमी ठेवा.

२. मुलांना स्विमिंगला पाठवण्यापूर्वी, स्विमिंग पूलच्या स्वच्छतेची खात्री करा. काही वेळा पूलाच्या पाण्यात क्लोरीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पूलाचे पाणी अनेक दिवस बदलले जात नसल्याने पावसाचे पाणीही (Water) त्यात साचून राहाते. अशा स्थितीत मुलांना त्वचेचा संसर्ग आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.

Parenting Tips in marathi
Parenting Tips : वाढत्या वयानुसार मुलांना द्या असा आहार !

३. मुलांनी स्विमिंग पूलमध्ये जाण्यापूर्वी फ्लोटर्स, डोळ्यांचे चष्मे, इअर प्लग, कॅप, आणि टॉवर यांसारखी सुरक्षा उपकरणे घालण्यास विसरू नका. यामुळे आपले मूल निर्भयपणे पोहण्याचा सराव करू शकेल आणि आपण मुलाच्या सुरक्षिततेबाबत मोकळे होऊ शकाल.

४. मुलांना शिकवणारे आणि मुलांना त्यांच्या भरवशावर सोडणारे जलतरण प्रशिक्षक आणि लाइफ गार्ड पाहून तुम्ही अनेक वेळा प्रभावित होतात. पण प्रत्येक चांगला जलतरणपटू त्याच्या कामात पारंगत असेलच असे नाही. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण आणि शिकवण्याची पद्धत नीट तपासा.

५. साधारणपणे १५ ते २० दिवस सतत पोहण्याचा सराव केल्यावर मुले पोहणे शिकतात. अशा परिस्थितीत मुलांचा आत्मविश्वास सातव्या गगनाला भिडलेला असतो आणि ते कोणत्याही नदी किंवा तलावात पोहायला तयार असतात. पण, मुलांना हे करण्यापासून रोखा. कारण नदीच्या लाटा आणि तलावांचे पाणी स्विमिंग पूलच्या पाण्यापेक्षा खूप वेगळे असते. अशा परिस्थितीत अनुभवाशिवाय नदी, तलाव आणि तलावात उडी मारणे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

या सगळ्या गोष्टींची योग्य ती खात्री करुन मुलांना पोहण्यास पाठवा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.