सतत स्क्रीनचा वापर करत असाल तर डोळ्यांची काळजी अशी घ्या

आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतो हे आपण पाहायला हवे.
सतत स्क्रीनचा वापर करत असाल तर डोळ्यांची काळजी अशी घ्या
how to take care of eyes using screenब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत किती काळजी घेतो हे आपण पाहायला हवे. आपल्या सौंदर्यांत डोळे हे सुंदर आहेत. त्याच्या काळजी आपण कशी घेतो हे आपल्यावर अंवलंबून आहे.

हे देखील पहा-

बदलत्या जीवनशैलीमुळे आपण सतत स्क्रीनसमोर असतो. त्याच्या थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे चुरचुरणे किंवा त्यांची आग होणे यांसारखे प्रकार सुरु असतात. स्क्रीनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे डोळ्यांना हानी पोहोचते आणि त्याचा डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण स्क्रीनचा योग्य वापर कसा कराव व डोळ्यांची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.

१. सतत स्क्रीनचा वापर करत असल्यास आपले डोळे कोरडे पडतात त्यांना पुन्हा मॉइश्चरायझ करण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे काही मिनिटांसाठी डोळ्यांची उघडझाप करणे असे केल्याने डोळ्यांना आराम मिळतो.

how to take care of eyes using screen
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम विषयी असणारे समज व गैरसमज जाणून घ्या

२. बऱ्याच स्मार्टफोन्सला डिफॉल्टनुसार अँटी-ग्लेअर स्क्रीन मिळते. जर अशी स्क्रीन आपल्या स्मार्टफोनला नसेल तर डोळ्यांमध्ये हानिकारक प्रकाशाचे प्रमाण वाढते. त्यासाठी अँटी-ग्लेअर स्क्रीन आपल्या स्मार्टफोनला लावा.

३. आपण काम करताना आपले डोळे स्क्रीनवर सतत स्थिर असतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास जाणवू लागतो अशावेळी डोळ्यांवर सतत पाणी मारा. ज्यामुळे ते स्वच्छ होतील.

४. स्मार्टफोनचा (Mobile) वापर करताना नाईट मोडचा वापर करा ज्यामुळे स्क्रीनवर असणारे किरणे आपल्या डोळ्यांना हानी पोहचवू शकणार नाही. याचा वापर केल्याने आपली झोप देखील सुधारु शकते.

५. स्क्रीनचा वापर झाल्यानंतर बाजारात अनेक प्रकारचे आय ड्रॉप्स उपलब्ध आहेत ज्याचा वापर आपण करून डोळ्यांची काळजी घेऊ शकतो.

६. सतत स्क्रीनचा वापर करत असू तर आपण डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.

७. तसेच डोळ्यांची (Eye) काळजी घेण्यासाठी आपण आपल्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यामुळे डोळ्यांची दूर दृष्टी सुधारण्यास मदत होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com