बाळ जन्मल्यानंतर वैवाहिक आयुष्यातील समस्यांना सामोरे जाताय तर या गोष्टींची काळजी घ्या

लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याची एका ठराविक काळानंतर पालक बनण्याची इच्छा असते.
बाळ जन्मल्यानंतर वैवाहिक आयुष्यातील समस्यांना सामोरे जाताय तर या गोष्टींची काळजी घ्या
How to give time to your relationship after baby born, Parenting tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याची एका ठराविक काळानंतर पालक बनण्याची इच्छा असते. बाळ जन्मल्याचा जितका आनंद पालकांना असतो किंबहुना त्यापेक्षा जास्त त्रास बाळ जन्मल्यानंतर सहन करावा लागतो. (Parenting tips in Marathi)

हे देखील पहा-

प्रत्येक नात्यात संवाद अधिक महत्त्वाचा असतो. संवाद न साधल्यामुळे आपल्या नात्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बाळ जन्मल्यानंतर आपल्या जोडीदाराचे लक्ष हे पूर्णत: त्याच्यावर असते त्यामुळे अनेकदा आपली चिडचिड होऊ लागते. बाळ जन्मला आल्यानंतर आपल्याला एकमेकांना पूरेसा वेळ देता येत नाही त्यामुळे नात्यात अंतर पडत जाते. नवजात बालकाचे झोपेचे चक्र देखील उलट असते त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतो. मुलाच्या जन्मानंतर जोडप्यांच्या नात्यात अनेक समस्या निर्माण झाल्याचे अनेकदा दिसून येते. एवढेच नाही तर कधी कधी त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर येते. अशावेळी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घ्या.

१. प्रत्येक नात्याला वेळ आणि प्रेमाची गरज असते. पण मूल जन्माला आल्यानंतर त्याची अधिक काळजी घेण्यात आईचा वेळ जातो. अशावेळी आपल्या जोडीदाराला नकारात्मक वाटू लागते. आपल्याला आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागते. अशावेळी आपण त्यांच्याशी छोट्या छोट्या गोष्टीतून संवाद साधायला हवा. त्यांची विचारपूस करायला हवी.

How to give time to your relationship after baby born, Parenting tips
मुलांच्या उशीरा चालण्याचे नेमके कारण काय? जाणून घ्या त्यांच्या सवयी बद्दल

२. अनेक वेळा मुलांच्या (Child) जन्मानंतर जोडप्यांमध्ये जास्त तणाव आणि चिडचिडेपणा दिसून येतो. जबाबदारी वाढल्यामुळे त्यांना ताण येतो. इतकेच नाही तर रात्रीचे जागरणामुळे स्त्रियांची चिडचिड होते व भांडणे ही होतात. त्यासाठी आपण जबाबदारीने काम वाटून घ्यायला हवे. बाळाची काळजी घेण्यासाठी कोणाची तरी मदतही आपण घेऊ शकतो.

३. काही वेळा आर्थिक समस्यांमुळे आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. बाळ (Baby) जन्मल्यानंतर आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. हा खर्च उचलता न आल्यास आपल्या नात्यावर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होऊ लागतात. वाढत्या खर्चामुळे नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होते.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com