या पाच आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केल्यासही होऊ शकतो कॅन्सर...

आपल्या दररोजच्या आहारात आपण ज्या पदार्थांचे सेवन करतो ते पदार्थही कर्करोगाचे निदान करते.
कर्करोग हा आजार जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
कर्करोग हा आजार जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कॅन्सर हा एक आजार असून त्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अनेकदा असे मानले जाते की दारू, तेलकट पदार्थ, मीठ व मसाल्यांचे अतिसेवन केल्यामुळे देखील कर्करोगाचे निदान प्राप्त होते. बऱ्याच अंशी हे खरे जरी असले तरी रोज खाल्ल्या जाणाऱ्या या पदार्थांमुळे देखील कर्करोग होऊ शकतो.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, कर्करोग हा आजार जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. आपल्या दररोजच्या आहारात आपण ज्या पदार्थांचे सेवन करतो ते पदार्थही कर्करोगाचे निदान करते.

कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो हे जाणून घेऊ या

१. मासे - मासे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात ओमेगा ३ फॅटी ऍसिड आणि प्रथिने असून ते आपल्या शरीरासाठी पोषक असतात. तथापि, जर तुम्ही खारट माश्यांचे सेवन करत असाल तर कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सॉल्ट फिश म्हणजे मिठाच्या माध्यमातून माश्यांना दीर्घकाळपर्यंत साठवून ठेवणे. ही पद्धत आशिया आणि चीनमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. ह्या पद्धतीमुळे आपल्या शरीरात कर्करोग गुणधर्म निर्माण करू शकते, ज्यामुळे आपल्याला कर्करोग होऊ शकतो.

२. दुग्धजन्य पदार्थ - दुध, पनीर आणि दही हे दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या पदार्थातून प्रथिने आणि कॅल्शियम सारख्या पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतात. या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. तथापि, काही दुग्धजन्य पदार्थ प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. २०१४ च्या अहवालानुसार, दुग्धजन्य पदार्थ (Food) खाल्ल्याने आयजीएफ - १ (IGF-1) ची पातळी वाढते. त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाचे निदान प्राप्त होते.

३. मका - मका हा खाण्यास व पचण्यास अंत्यत हलका असा पदार्थ आहे. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. परंतु जेव्हा मका मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न बनवण्यासाठी वापरले जाते तेव्हा पीएफओए (PFOA) नावाच्या घटकापासून स्वादुपिंड, मूत्रपिंड, यकृत आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका निर्माण होत असतो. मका हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे पण तो नेहमी भाजून किंवा उकडून खाला पाहिजे.

कर्करोग हा आजार जगातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
Summer Tips : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा घोळ भाजीचे सेवन.

४. बटाटा - बटाटा हा कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ब, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि फॉस्फरस यासारख्या घटकांचा खजिना आहे. परंतु जेव्हा आपण त्यांना चिप्सच्या स्वरूपात खातो तेव्हा ते कर्करोगास (Cancer) कारणीभूत ठरू शकते. बटाट्याच्या चिप्समध्ये असलेले मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट शरीरासाठी चांगले नाही. त्यात ऍक्रिलामाइड (Acrylamide) असते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

५. रेड मीट - लाल मांस हे लोह, व्हिटॅमिन (Vitamins) ब१२, जस्त आणि प्रथिने यांसारख्या घटकांनी युक्त असा खजिना आहे. याच्या सेवनाने स्नायूं आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. मात्र, याच्या अतिसेवनाने अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, आठवड्यातून ६५- १०० ग्रॅम शिजवलेले लाल मांस खाऊ नये.

डिस्क्लेमर: हा आहार फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com