Gatari special recipe : चिकनचा बेत करताय? मास्टर शेफ कविराज खियालानीची ही स्वादिष्ट रेसिपी ट्राय करा

गटारीसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करुन पहा
Recipe, Food tips, Chicken recipe
Recipe, Food tips, Chicken recipeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : श्रावण हा महिना व्रत- वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यांमध्ये बरेच जण मासांहार करत नाही. त्यामुळे हा महिन्या सुरु होण्यापूर्वी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी गटारी साजरी केली जाते.

हे देखील पहा -

या दिवशी आपण आपल्या मित्र- मैत्रिणी सोबत किंवा कुटुंबासोबत याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी आपला बेत ठरलेला असतो. चिकन किंवा मटणाच्या अनेक रेसिपी बनवून आपण त्यावर ताव मारत असतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही चमचमीत स्वादिष्ट रेसिपी ट्राय करायला सांगणार आहोत

मध व तिळाचे चिकन विंग्स कसे बनवायचे ते पाहूया

साहित्य -

चिकन विंग्स - १२ ते १४ पीस

मॅरीनेशनसाठी-

तीळाचे तेल (Oil) - १ मोठा चमचा

चवीनुसार मीठ आणि मिरपूड

मिक्स हर्ब्स - १/४ चमचा

लाल मिरची पावडर - १ ते २ चमचे

सोया सॉस - १ ते २ चमचे

मध - २ ते ३ चमचे

व्हिस्की/व्हाइट वाइन - १ ते २ चमचे (ऐच्छिक)

कोटिंग आणि तळण्यासाठी:

कॉर्न फ्लोअर पावडर - १/४ कप

मैदा - १/४ कप

पीठ मळण्यासाठी - मीठ आणि मिरपूड

तेल - तळण्यासाठी

पांढरे तीळ - २ ते ३ चमचे

सर्व्ह करण्यासाठी - सॉस

Recipe, Food tips, Chicken recipe
Recipe : फक्त रुपयात बनवा बेसनापासून स्वादिष्ट स्नॅक्स, जाणून घ्या रेसिपी

कृती -

चिकन विंग्स रेसिपी तयार करण्यासाठी चिकनचे पीस धुवा आणि स्वच्छ (Clean) करा. मिक्सिंग बाऊलमध्ये मॅरीनेशनसाठी घेतलेले सर्व साहित्य एकत्र फेटा. यात चिकन विंग्स घालून मिक्स करा. वेगळ्या भांड्यात सर्व पीठ मिक्स करुन घ्या. चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला व त्यात चिकन विंग्सचे पीस घाला. आता एका कढईत तेल गरम करा, नंतर त्यात चिकनचे पीस घाला आणि सुमारे ४ ते ६ मिनिटे तळून घ्या.डिप्स सर्व्हिंग प्लेटवर ठेवा आणि तळलेले विंग्स वेगळे करा आणि थोडा मध आणि पांढरे तीळ घालून गरम सर्व्ह करा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com