Tata Nexon : भन्नाट फिचर्ससह ११ व्हेरियंट्समध्ये फेसलिफ्ट लॉन्च! किंमत पाहा

Tata Nexon Facelift: टाटा नेक्सॉनची फेसलिफ्ट कार बाजारात नुकतीच लाँच केली आहे.
Tata Nexon Facelift
Tata Nexon FaceliftSaam Tv

Tata Nexon Facelift Price 2023

टाटा मोटर्स ही वाहन उत्पादनातील विश्वसनीय कंपनी आहे. टाटा नेक्सॉनची फेसलिफ्ट कार बाजारात नुकतीच लाँच केली आहे. या कारच्या किमती १४ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार होती. तर आता किंमत अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनसह ही कार आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारमध्ये काही बदल करण्यात आले आहे. आधीच्या मॉडेलपेक्षा ही कार पूर्णपणे वेगळी आहे.

1. किंमत

टाटा नेक्सॉनची किंमत आज जाहीर होणार होती. कारची किंमत ८.१० लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार एकूण ११ व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय कंपनीने कारमध्ये नवीन फिचर्सचा समावेश केला आहे.

Tata Nexon Facelift
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी विशेष! वाहन-प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम योग, शुभ मुहूर्त पाहा

2. टाटा नेक्सॉनची वैशिष्ट्ये

टाटा नेक्सॉनच्या नवीन फेसलिफ्टमध्ये आतील भाग आणि बाह्य भागात खूप बदल करण्यात आला आहे. या कारला स्लिप्ट हेडलँप सेटअप देण्यात आले आहे. ज्यामध्ये टाटा मोटर्सचा लोगो आहे. हेडलाइट्सचा खालचा भाग ट्रॅपेझॉइडल हाउसिंगमध्ये ठेवलेला आहे. ज्यामध्ये जाड प्लॅस्टिकची पट्टी आहे. Nexon ला नवीन LED डेटाइम रनिंग लाईट सिग्नेचर देखील मिळतात.

3. फिचर्स आणि डिझाइन

नेक्सॉन कारच्या केबिनला नवीन प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. त्यात एक टचस्क्रीन सेट अप आणि टू स्पोक स्टीअरिंग व्हीलसह, कर्व्ह आकाराचे इंटेरिअर डिझाइन करण्यात आले आहे. कारमधील एसी व्हेंट्स थोडे पातळ आहे. डॅशबोर्डवर कमी बटण असल्याचे हाताळण्यास सोपे जाते.

सेंट्रल कन्सोलमध्ये टच स्क्रिनवर आधारित HVAC कंट्रोल पॅनलने घेरलेले दोन टॉगल आहे. डॅशबोर्डवर फिनिशसारख्या कार्बन- फायबरसह लेदर इन्सर्ट देखील लावण्यात आला आहे. यात १०.२५ इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. १०.२५ इंच फुल स्क्रिन डिजिटल इनंस्ट्रुमेंट कलस्टर उपलब्ध आहे. हे नेव्हिगेशनसाठी कस्टमाइझ केले जाऊ शकते.

4. इंजिन

कंपनीने नवीन नेक्सॉनच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. हे इंजिन १.२ टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेलसह येते. त्याचे टर्बो पेट्रोल इंजिन चार वेगवेगळ्या गिअरबॉक्सची निवड करते. यात ५-स्पीड मॅन्युअल, ६-स्पीड मॅन्युअल,६-स्पीड मॅन्युअल AMT आणि ७-स्पीड ड्युअल मॅन्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्स समाविष्ट आहे.

Tata Nexon Facelift
iPhone 15 : संकटकाळी आयफोन येईल धावून, नव्या फीचरमुळे होणार मदत

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com