TATA देणार Jio ला टक्कर; 5G क्रांती साठी सज्ज!

आता TATA चा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. Airtel च्या मदतीने Reliance Jio ला मोठी टक्कर देण्यासाठी TATA ने तयारी सुरू केल्याचे चर्चा सुरु आहेत.
TATA देणार Jio ला टक्कर; 5G क्रांती साठी सज्ज!
TATA देणार Jio ला टक्कर; 5G क्रांती साठी सज्ज! Saam Tv

पुणे: Reliance Jio च्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले. ज्या टेलिकॉम कंपन्या आधी ग्राहकांना लुटत होत्या त्या पूर्णपणे बंद पडल्या. JIO च्या कमी किमतीत मिळणाऱ्या सेवेमुळे सर्व ग्राहकांनी दुसऱ्या कंपनयनकडे पाठ फिरवली. टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. Airtel या कंपनीने जशी ने 5G चाचण्या सुरू केली तशी अलीकडेच मुकेश अंबानी यांनी सुद्धा Jio 5G ची घोषणा केली.

सध्या भारतात ग्राहक 4-G नेटवर्क वापरतात. मात्र, अनेक कंपन्यांनी 5-G टेस्टिंग सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच 5 G इंटरनेट सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 5-G इंटरनेट मध्ये आता TATA ग्रुपचा समावेश झाला आहे.

हे देखील पहा-

टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये टाटा सन्सने कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली. या करारानंतर आता टाटा ग्रुप 5G मध्ये प्रवेश करणार आहे. टाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील 43.35 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे.

TATA सन्सची साहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टसोबत करार Agreement केला आहे.

5G नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत TATA ग्रुप आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल TCS च्या मदतीने हे काम करणे शक्य होईल. तर हार्डवेअर सपोर्ट तेजस नेटवर्कच्या मदतीने मिळेल.

TATA देणार Jio ला टक्कर; 5G क्रांती साठी सज्ज!
नरेंद्र मोदी यांना चहा विक्रेता म्हणण्याऐवजी चहा विक्रेत्याचा मुलगा म्हटले पाहिजे- प्रल्हाद मोदी

अलीकडेच Bharti Airtel आणि TATA ग्रुपची कंपनी TCS ने भारतात 5 G नेटवर्कसाठी स्ट्रॅटिजिक पार्टनरशिपची Strategic Partnership घोषणा केली होती. टेलिकॉम कंपनी एअरटेल जानेवारी 2022 पर्यंत भारतात 5G नेटवर्कच्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याच्या तयारीत आहे.

एकीकडे Jio देशाला 2G internet पासून मुक्त करत, 5G युक्त करण्याची घोषणा केली. तर आता TATA ग्रुप देखील तेजसमध्ये हिस्सेदारी खरेदी करून जिओला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. असे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, अलीकडेच टाटा TATA उद्योग समूहाने 1MG कंपनीच्या शेअर्समधील मोठा हिस्सा खरेदी केला.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com