Tea Effect On Health: चहा पिण्याचे शौकीन असाल तर ही बातमी नक्की वाचा

एका नवीन अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये चहाचे फायदे सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत.
Tea Effect On Health: चहा पिण्याचे शौकीन असाल तर ही बातमी नक्की वाचा
TeaSaam Tv

Tea Health Benefits: चहा जगाच्या कानाकोपऱ्यात पसंत केला जातो. जागा आणि ऋतूनुसार चहा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, परंतु दुधाचा कडक चहा हा सर्वांनाच आवडतो. ताजेपणा देण्यासोबतच चहाचे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. चहाचे औषधी गुणधर्म घेण्यासाठी चायनीज आणि जपानी लोकही मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करतात. चहा पिणाऱ्यांपैकी अनेकांना चहाचे किती फायदे आहेत हे माहितीच नसेल. तर काहीजण चहा फक्त प्यायचा म्हणून पितात. परंतु आता एका नवीन अभ्यास समोर आला आहे ज्यामध्ये चहाचे फायदे सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत.

पॉलीफेनॉल हे चहाच्या पेयांमध्ये आढळतात ज्याचे विविध आरोग्याचे फायदे आहेत. चहामध्ये आढळणारे कॅटेचिन्स, थेफ्लाव्हिन्स आणि थेरुबिगिन्स यांसारख्या संयुगेमध्ये अनेक दाहक-विरोधी, कर्करोग-विरोधी आणि कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असतात. ते आपल्याला विविध मार्गांनी मदत करतात. नवीन संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की चहा कर्करोग आणि हृदयाच्या समस्यांशी लढण्यास आणि स्मृतिभ्रंशाचा (Dementia) धोका कमी करण्यास मदत करते.

Tea
बायकोला खुश ठेवण्यासाठी कायपण! ATMमध्ये अफरातफर करून नागरिकांना घालायचा गंडा

या रोगांचा धोका होतो कमी;

चहाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Anti-Oxidants) मोठ्या प्रमाणात आढळतात, जे रक्तातील हानिकारक रेणू बाहेर काढण्यात आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. संशोधक डॉ. टेलर वॉलेस (Dr. Taylor Wallace) यांच्या मते, चहा असे पेय आहे जे लोक सहज पिऊ शकतात. जर व्यक्तीने त्याचे सेवन केले तर तो निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो.

यूएस टी कौन्सिलनुसार, ब्लॅक, ग्रीन आणि हर्बल टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स चांगल्या प्रमाणात आढळतात. ते रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. ऑस्ट्रेलियात केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, जे लोक दिवसातून 1 ते 5 कप चहा पितात त्यांना स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो.

संशोधनात असे आढळून आले की, दररोज 1 कप कप चहा प्यायल्याने स्ट्रोक किंवा हृदयाच्या समस्येचा धोका 4 टक्क्यांनी कमी करू शकतो. तसेच तरुण लोकांमध्ये मृत्यूचा धोका 1.5 टक्क्यांनी कमी करू शकतो.

हे देखील पाहा-

जास्त गरम चहा प्यायल्याने होऊ शकतो कॅन्सर!

तसेच, अभ्यासात आढळून आले की फ्लेव्होनॉइड्स आतड्यांमधील विशिष्ट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. अमेरिकेतील बोस्टन येथील टफ्ट्स युनिव्हर्सिटीचे डॉ. जेफ्री ब्लमबर्ग यांच्या मते, संशोधनात असे दिसून आले आहे की, चहामुळे मानवाला अनेक प्रकारे फायदा होतो. परंतु, अभ्यासात असाही इशारा दिला आहे की, गरम चहामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा (Esophageal Cancer) धोका वाढू शकतो. अन्ननलिका कर्करोग हा एक कर्करोग आहे जो अन्ननलिकेत कुठेही होऊ शकतो. हा कर्करोग 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये आढळतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.