Teach Children To Value Money : या पद्धतीने मुलांना पैशांची किंमत करायला शिकवा, लोभापासून राहतील दूर

Parents Teach Value Of Money : पालक मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत.
Teach Children To Value Money
Teach Children To Value MoneySaam Tv

Value Of Money : पालक मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाहीत. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आर्थिक शिक्षण देखील महत्त्वाचे आहे आणि ते मुलांच्या लहान वयापासून सुरू करणे गरजेचे आहे.

बचतीचे महत्त्व मुल जेवढ्या लहान वयात आत्मसात करेल तेवढा त्याला भविष्यात फायदा होईल. तुम्हालाही जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने (Children) मोठे होऊन एक चांगला आणि प्रामाणिक माणूस व्हावा तर त्याला लहानपणापासूनच पैशाची किंमत करायला शिकवा. चला तर मग यासाठी जाणून घेऊया काही सोप्या टिप्स ज्या तुम्ही फॉलो करून मुलांना पैशांची किंमत करायला शिकवू शकता.

Teach Children To Value Money
Sweet Food Affect Children's Memory : गोड पदार्थामुळे मुलांच्या स्मरणशक्तीवर होतोय का परिणाम?

मुलांना पैशाचे मॅनेजमेंट शिकवा -

मुलांना पैशांचे (Money) व्यवस्थापन शिकवायचे आहे म्हणून बाहेर पाठवण्याची काही गरज नाही, तुम्ही त्यांना घरबसल्या काही काम सांगू शकता आणि कामाच्या बदल्यात भेट म्हणून त्यांना काही पैसे देऊ शकता. असे केल्याने मुलांना कष्ट करून पैसा कसा मिळतो आणि जीवनात पैशांची किंमत काय आहे हे समजण्यास मदत मिळते.

पॉकेट मनी -

मुलांमध्ये मनी मॅनेजमेंट स्किल विकसित करण्यासाठी, मुलांना खर्चासाठी मर्यादित प्रमाणात पॉकेट मनी देणे सुरु करा. त्यामुळे मुले गरजेनुसार पैसे खर्च करतील आणि विनाकारण होणारा खर्च कमी करतील किंवा शहाणपणाने खर्च करायला शिकतील.

Teach Children To Value Money
How to Control Weight for Children : कमी वयात मुलांचे वजन झपाट्याने वाढतेय ? वैतागले आहात ? 'या' 5 टिप्स फॉलो करा

पिगी बँक -

लहानपणापासूनच मुलांना पैशांची किंमत कळण्यासाठी महागड्या वस्तू गिफ्ट करण्यापेक्षा पिगी बँक ठेवायला शिकवणे गरजेचे आहे. त्यामुळे गुल्लकच्या मदतीने मुले हळूहळू स्वतःचा छंद पूर्ण करायला शिकतील. तसेच विनाकारण होणारा खर्च कमी करून, पैसे जमा करायला शिकतील.

घरातील जबाबदारी द्या -

वयाच्या लहानपणापासूनच मुलांना घराच्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या देयायला सुरू करा. परिणामी मुले पैशांचे मॅनेजमेंट करायला शिकतील. त्यामुळे रेशन ते भाजीपाला खरेदी करण्यापर्यंत मुलांची मदत घ्या. यामुळे वाढलेली महागाई मुलांच्या लक्षात येते आणि मुले केवळ आवश्यक गोष्टींवर खर्च करायला सुरू करतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com