WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureSaam TV

WhatsApp Edit Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं भन्नाट 'EDIT' फीचर; आता सेंड केलेला मेसेजही एडिट करता येणार

WhatsApp New Feature: नव्या एडिट फीचरमुळे यूजर्सना आता पाठवलेले टेक्स्ट मेसेज एडिट करता येणार आहे.

WhatsApp New Edit Feature: इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी नेहमीच नवनवीन चांगले फीचर आणत असतं. यूजर्सच्या गरजा ओळखून नवे फीचर आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. अशीच एक गरज ओखळून व्हॉट्सअॅपने भन्नाट 'EDIT' फीचर आणलं आहे.

नव्या एडिट फीचरमुळे यूजर्सना आता टेक्स्ट मेसेज एडिट करता येणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्सला मेसेज पाठवल्यानंतरही एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे.

WhatsApp New Feature
Instagram Hacking Scam : तुमची एक चूक अन् इंस्टाग्राम हॅक ! कसे प्रोटेक्ट कराल तुमच्या अकाउंटला, जाणून घ्या प्रोसेस स्टेप-बाय-स्टेप

मेसेज 15 मिनिटांच्या आता एडिट करावा लागेल

यूजर्स मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत आपले मेसेज एडिट करु शकतात. हे फीचर अलीकडे वेब एडिशनमध्ये बीटा टेस्टिंगसाठी देण्यात आलं आहे. आता कंपनीने त्याच्या ऑफिशियल रोलआउटची घोषणा केली आहे.

यूजर्सनी 15 मिनिटांच्या आता बदलेला मेसेज एडिटेड असा दिसेल. म्हणजेच, रिसिव्हरला मेसेज एडिट केल्याची माहिती मिळेल. परंतु तो एडिट केलेला मेसेज पाहू शकणार नाही.

मेसेज डिलिट करण्याची सुविधी आधीपासून उपलब्ध

अॅपमध्ये तुम्हाला आधीच पाठवलेला मेसेज डिलीट सुविधा मिळते. मात्र आता पाठवलेला मेसेज एडिट करता येत असल्याने मेसज पुन्हा टाईप करण्याचा वेळ वाचणार आहे. (Tech News)

अॅपलमध्ये सुविधा उपलब्ध

Apple ने iOS 16 मध्ये टेक्स मेसेज एडिट करण्याचे फिचर दिले आहे. अॅपल यूजर्सकडे मेसेज एडिट करण्यासाठी 15 मिनिटे आहेत. आयफोन यूजर्स पाच वेळा मेसेज एडिट करू शकतात. पण व्हॉट्सअॅपने सध्या अशी कोणतीही माहिती दिलेली नाही की यूजर्सना किती वेळा मेसेज एडिट करता येईल. (Latest News Update)

एडिट फीचर कसं काम करेल?

मेसेज एडिट करण्यासाठी यूजर्सना मेसेजवर लाँग प्रेस करावं लागेल. यानंतर एक पॉप-अप ऑप्शन दिसेल. ज्यामध्ये मेसेज एडिट करण्याचा ऑप्शन दिसेल. याच्या मदतीने युजर्स मेसेज एडिट करू शकतील. व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट या दोन्हींवर काम करतील.मात्र मेसेज पाठवल्याच्या 15 मिनिटांनंतर यूजर्स मेसेज एडिट करू शकणार नाहीत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com