टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला दिली टक्कर, प्रीमियम वर्जनमध्ये आणले हे नवीन फीचर्स

टेलिग्राम हे सोशल मिडीयावरील जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे.
Telegram premium version, Tech news in Marathi, Latest Tech News
Telegram premium version, Tech news in Marathi, Latest Tech Newsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : टेलिग्राम हे सोशल मिडीयावरील जगभरात सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. या अॅपवरुन आपल्या अनेक नवीन चित्रपट, कार्यक्रम किंवा अनेक ठळक घटना कळून येतात. हे अॅप व्हॉट्सअॅपसारखे असून ग्राहंकासाठी नवनवीन फीचर्स आणत राहते. (Tech news in Marathi)

हे देखील पहा -

२०२२ मध्ये टेलिग्राम हे जगभरातील टॉप-५ मध्ये डाउनलोड केलेल्या जाणाऱ्या अॅप्सपैकी एक आहे. नुकतेच टेलिग्रामने त्यांच्या ग्राहकांसाठी टेलिग्राम प्रीमियम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. ज्यात काही प्रमाणात शुल्क आकारली जाणार असून त्यात अनेक नवनवीन फीचर्स आपल्याला अनुभवायला मिळतील. टेलिग्राम प्रीमियममध्ये कोणते नवीन फीचर्स आले ते पाहूया

१. २०२२ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार ७०० दशलक्षाहून अधिक लोक टेलिग्रामचा वापर करतात. यामुळेच टेलिग्रामने ग्राहकांसाठी टेलिग्राम प्रीमियम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.यात शुल्क आकारुन त्यांना अनेक नवीन फीचर्सचा आनंद घेता येईल.

Telegram premium version, Tech news in Marathi, Latest Tech News
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनसाठी येतंय नवीन फीचर, मिळणार 'ही' मोठी सुविधा

२. सध्या टेलिग्रामने त्याच्या प्रीमियम सोयीबद्दलच्या किंमतीची कोणतीही माहिताी दिली नाही परंतु टेकक्रंचच्या अहवालानुसार, सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत (Price) प्रति महिना $ 4.99 (जवळपास 389 रुपये )ठेवता येऊ शकते.

३. यामध्ये प्रीमियम सोयीमध्ये यूजर्स ४ जीबीच्या फाइल्स अपलोड करता येतील तसेच फ्री यूजर्सना सध्या २ जीबीची मर्यादा फाइल्स अपलोड करण्यासाठी मिळत आहे.

४. टेलिग्राम कंपनीने असे सांगितले आहे की, प्रीमियम वापरकर्ते वेगाने फाइल्स डाउनलोड करु शकतात.

५. प्रीमियम वापकर्त्यांसाठी दुहेरी मर्यादा मिळणार आहे. ते १००० चॅनेलमध्ये सामील होऊ शकतात आणि प्रत्येक २०० चॅट्ससह २० चॅटचे फोल्डर तयार बनवू शकतात.

६. तसेच प्रीमियम वापकर्त्यांना व्हॉइस मेसेज टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय असेल. प्रीमियम सुविधेत यूजर्सना स्टिकर्स व्हिडीओ पाहता येऊ शकतात.

७. यात डीफॉल्ट चॅट फोल्डर्स बदलण्याच्या पर्यायासह युनिक रिअॅक्शन्स देखील आहेत. मेसेजिंग अॅपने प्रीमियम वापरकर्त्यांसाठी १० हून अधिक नवीन इमोजी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रीमियम ग्राहकांसाठी चॅट सूची आयोजित करण्यासाठी नवीन साधन मिळेल.

८. प्रीमियम वापरकर्त्यांना अॅनिमेटेड प्रोफाइल व्हिडिओ हा आँप्शन मिळेल. आपल्याला तो अॅनिमेटेड व्हिडिओ (Video) प्रोफाइल ठेवता येऊ शकतो.

९. प्रीमियम वापरकर्त्यांना नवीन फीचर्स मिळून त्याला आपण होम स्क्रीनवर जोडू शकतो. तसेच त्याचे आँयकॉनही आपल्याला बदलता येऊ शकते.

१० . अॅपच्या प्रीमियम सेवेत आपल्याला जाहिराती दिसणार नाहीत ज्यामुळे आपला वेळ वाचू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com