
मुंबई : आपल्यापैकी बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते जीम, योगा व आपल्या आहारात सतत बदल करत असतात.
हे देखील पहा -
वजन वाढण्याच्या त्रासामुळे आपण अधिकच त्रस्त असतो. व्यायाम करण्यासाठी उत्तम वेळ (Time) ही सकाळची मानली जाते. व्यायम केल्याने आरोग्य सुधारते तसेच शरीर लवचिक होऊन अनेक आजारांपासून मुक्तता मिळते. कामाच्या गडबडीत काहींच्या कामांच्या वेळांमध्ये बदल होत असतात अशावेळी वर्कआउट करण्याची योग्य वेळ नेमकी कोणती हे जाणून घेऊया. (best time for exercise)
१. सकाळी वर्कआउट केल्याने आपल्या मेटाबॉलिज्मला गती देते. मेटाबॉलिज्म वाढून कॅलरी बर्न करण्याची आपली कपॅसिटी वाढते. तसेच वजन कमी करणाऱ्यासाठी सकाळी व्यायाम करणे जास्त फायद्याचे असते.
२. आपण सकाळी वर्कआउट केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात लवकर होते. आपले एक काम लवकर झाल्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते व दिवसभर आपल्याला ऊर्जा प्राप्त होते.
३. आपल्या कामाची वेळ व आपली लाइफस्टाइल (Lifestyle) अशी असेल की, आपल्याला सकाळी आपल्याला वर्कआउट करता येत नसेल त्यावेळी आपण संध्याकाळी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू शकतो.
४. सायंकाळच्या वर्कआउटमध्ये आपण जास्त स्ट्रेंथ अॅक्टिव्हिटीज करू शकतो त्याचे कारण असे की, आपले शरीर व मेंदू दिवसभराच्या अॅक्टिव्हिटीजमुळे आधीपासूनच अॅक्टिव्ह झालेला असतो. त्यासाठी सायंकाळच्या वर्कआउटमध्ये आपण बॉडी बनवू शकतो.
५. दिवसभराच्या ताणामुळे आधीच आपले शरीर थकलेले असते अशावेळी आपण सायंकाळी वर्कआउट केला दिवसभराचा ताण निघून जाण्यास मदत होईल व झोपही शांत लागेल. तसेच सायंकाळी वर्कआउट केल्याने आपल्याला आरोग्याला त्याचा फायदा होतो.
६. वर्कआउट करण्यासाठी दोन्ही वेळ उत्तम आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याला त्याचा फायदा होतो. वर्कआउट नियमित केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.