सॅमसंगचा सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच होणार; जाणून घ्या किंमत

सॅमसंग गॅलेक्सी F13 इंट्रोडक्ट्री ऑफर अंतर्गत, हा फोन फक्त १०,९९९ किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे.
सॅमसंगचा सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन लाँच होणार; जाणून घ्या किंमत
The Samsung Galaxy F13 will be launched on June 29 Saam Tv

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी F13 (Samsung Galaxy F13) हा मोबाईल भारतात लाँच (launching) करण्यात आला आहे. हा मोबईल फोन सर्व सामन्यांच्या बजेटमध्ये बसणारा फोन आहे. हा मोबईल १०,९९९ या किंमतीत(price) विकत घेता येणार आहे. हा फोन २९ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या फोनचे वैशिष्य म्हणजे या फोनला 600mAhबॅटरी, FHD+डिस्प्ले आणि ऑटो डेटा स्विचिंग मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. या मोबईलच्या 4GB+64GBची किंमत ११,९९९ असणार आहे, तर 4GB+128GBची किंमत १२,९९९ असणार आहे. परंतु इंट्रोडक्ट्री ऑफर अंतर्गत, हा फोन फक्त १०,९९९ किंमतीत उपलब्ध करून दिला जात आहे.

The Samsung Galaxy F13 will be launched on June 29
मेष राशी असणाऱ्या व्यक्तींचा मेषसोबत कसे असते नाते

सॅमसंग गॅलेक्सी F13या मोबईलला 6.6 इंच FHD+LCDडिस्प्ले दिला गेला आहे. जो या मोबईलच्या स्क्रीनला सिल्वर स्क्रीनमध्ये रुपांतरीत करते. ग्लास प्रोटेक्शनसाठी स्क्रीनला गोरील्ला ग्लास 5चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यामुळे स्क्रीनला स्क्रैच पडण्याची भीती राहणार नाही.

स्मार्टफोन Exynos850 चिपसेटसह , 4GBएवढा रॅम आणि 128GBअंतर्गत स्टोरेजसह मार्केटमध्ये हा फोन आणला गेला आहे. या रॅमला 8GBपर्यंत वाढविले आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी, याला ऑटो डेटा स्विचिंग मोड देण्यात आला आहे, जो या सेगमेंटच्या फोनमध्ये प्रथमच असेल. या फोनमध्ये 8 GBपर्यंत रॅम उपलब्ध आहे. हा फोन वॉटरफॉल ब्लू, सनराईज कॉपर आणि नाईटस्की ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला जाईल.

The Samsung Galaxy F13 will be launched on June 29
केसांना सीरम लावताय तर या गोष्टींची काळजी घ्या

50 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध

सॅमसंग गॅलेक्सी F13मध्ये 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेन्स, 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड लेन्स आहे.

पॉवरसाठी, फोनमध्ये 6000mAhबॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगसह येते. सॅमसंग कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, GalaxyF13अॅडप्टिव्ह पॉवर सेव्हिंग आणि AIपॉवर मॅनेजमेंटला सपोर्ट करते. तसेच मोबईलच्या अॅप्सना तीन दिवस स्लीप मोडमध्ये आणि एक महिना डीप स्लीप मोडमध्ये वापरण्यायोग्य ठेवते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com