योग्य पोषक आहार आहे सौंदर्याचे रहस्य!

हजारो उपाय करुन देखील आपल्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा चेहऱ्याच्या इतर समस्या जाणवू लागतात.
Skin care tips in Marathi, Beauty Tips
Skin care tips in Marathi, Beauty Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रकारची उत्पादने वापरत असतो. हजारो उपाय करुन देखील आपल्या चेहऱ्यावर मुरुमे किंवा चेहऱ्याच्या इतर समस्या जाणवू लागतात.(Skin care tips in Marathi)

हे देखील पहा -

हल्ली सुंदर दिसणं प्रत्येकासाठीच एवढं महत्त्वाचं झालं आहे की, त्यासाठी प्रत्येक जण दररोज हजारो उपाय करत आहे. शाळेत जाणाऱ्या मुली, गृहिणी एवढंच नाही, तर वयोवृद्ध स्त्रियासुद्धा सुंदर दिसू इच्छितात. व्यायाम करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहेत. आपल्या सगळ्यांनाच छान दिसायचं असतं. पण सुंदर दिसण्यासाठी व्यायामाबरोबरच आहाराचीही निवड विचारपूर्वक करणे महत्त्वाचे ठरते. सौंदर्याचे रहस्य आपल्या आहारात दडलेले आहे.

कोणत्या पदार्थाचे सेवन करायला हवे

१. दह्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असणारे जीवनसत्त्व (Vitamins) ब ५ आणि ब १२ शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत बनवून त्वचेला (Skin) चमकदार बनवते. दह्यामध्ये असणारी प्रोबायोटिक्स रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. आतड्याशी संबंधित संसर्गाला दूर ठेवण्याचे कामही दही करते. त्यामुळे आपला चेहरा चमकदार बनतो.

Skin care tips in Marathi, Beauty Tips
सुदृढ बाळाचे दात येण्यास उशीर होत असला, तर घाबरू नका हे उपाय करा

२. डाळींमध्ये सुंदरतेचा खजिना डाळींमध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. डाळी इलेक्ट्रोलाइट्सला संतुलित करून फायदेशीर ठरते. त्वचेला सुंदर बनविण्यास मदत करतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आलेली असू देत किंवा सूज, ही सगळी शरीरात पाणी जमा होण्याची लक्षणं आहेत. डाळींचे सेवन या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

३. पिवळी आणि नारंगी रंगाची फळ त्वचेसाठी फायदेशीर असतात. आपल्या आहारात टोमॅटो, संत्री, केळ, आंबा यांचा समावेश करा.

४. पालेभाज्यामध्ये असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे त्वचेसाठी फायदा होतो. म्हणून आपल्या आहारात पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करा.

६. अंड्याचा पांढरा भाग त्वचेचा उत्तम मित्र आहे. अंड्यामध्ये अलब्यूमिन नावाचे प्रथिन असते, जे फायदेशीर असते. यामुळे त्वचेचा विकास योग्यप्रकारे होतो. सुंदर त्वचेसाठी दररोज एक अंड खा.

७. सोडियम, पोटॅशियम आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचं उत्तम मिश्रण. समुद्री आहारात असणारी अँटीऑक्सिडंटस त्वचेला निरोगी ठेवतात, यामुळे त्वचा उजळते. ऑलिव्ह, सोयाबीन, सूर्यफुलाचं तेल त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. अक्रोड खाणे फायदेशीर ठरते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com