मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; वाचा सविस्तर

मात्र आपण घरी स्टील किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात दही बनवून त्याचे अनेक गुणधर्म गमावून बसतो.
मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे;  वाचा सविस्तर
मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे; वाचा सविस्तरsaam tv

आपण अनेकदा पहिले असेल की, दुकानात किंवा गवळ्याकडे (दूध विक्रेता) दही मागितले असता ते मातीच्या भांड्यातून दही काढून देतात. खरं तर मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. मात्र आपण घरी स्टील किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात दही बनवून त्याचे अनेक गुणधर्म गमावून बसतो. मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे अनेक फायदे आहेत. जे आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे.

मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे;  वाचा सविस्तर
नानांवर कोण पाळत ठेवणार; पटोलेंच्या दाव्याची संजय राऊतांकडून खिल्ली

- दही ठेवण्यासाठी योग्य वेळ कोणती ?

सकाळी बनवलेले दही संध्याकाळी ते खाऊ नये, असे अनेकजण म्हणतात. कारण यामुळे दहयामधील घट्टपणा आणि गोडपणा कमी होतो. उन्हाळ्यात, संध्याकाळी 4-5 वाजता दही लावल्यास ते रात्री 10-11 वाजता बनते. पण रात्री 10- 11 वाजता दही खाण्याची योग्य वेळ नाही. मग अशावेळी हे दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेणेकडून ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी खाता येईल आणि तुम्हाला मस्त घट्ट आणि गोड दही मिळेल. हिवाळ्यात, दही बनण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.

- मातीच्या भांड्यात दही बनवण्याचे फायदे

- मातीच्या भांड्यात दही घालून तुम्हाला घट्ट दही मिळते. कारण, मातीचे भांडे दहयातील अतिरिक्त पाणी शोषून घेते.

- दही घालण्यासाठी ते योग्य तापमानात ठेवणे फार महत्वाचे आहे आणि मातीचे भांडे असे सामान्य तापमान राखण्यास मदत करते. ज्यामुळे बाह्य तापमानातील चढउताराचा दहयावर परिणाम होत नाही.

- मातीच्या भांड्यात दही ठेवल्याने त्याला विशिष्ट चव येते आणि त्याचा खातानाही त्याचा स्वाद चांगला लागतो.

- जमिनीत लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर सारखी अनेक नैसर्गिक खनिजे असतात, ही खनिजे दहयात जातात. ज्यामुळे दही अधिक निरोगी होते.

- दही अल्कधर्मी स्वरूपाचा आहे, ज्यामुळे दही गोड आहे.

दही खाण्याचे फायदे

सल्लागार आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या म्हणण्यानुसार दही खाल्ल्याने शरीरातील पाचन शक्ती सुधारते आणि यामुळे शरीराला व्हिटॅमिन बी -12, व्हिटॅमिन बी -6, आयरन, कॅल्शियम यासारखे अनेक पोषकतत्वे मिळतात. दहीमध्ये आपल्या पोटासाठी अनेक फायदेशीर बॅक्टेरिया देखील असतात.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com