
Diabetes Tips : मधुमेह रुग्णांनी औषधासोबतच योग्य आहार घेणे महत्त्वाचे असते. भारतातील मधुमेह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आनुंवंशिकता आणि वाढत्या वयामुळे हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.
अनियमित जीवनशैली आणि चुकीचा आहारामुळे देखील मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. दररोजच्या लहानसहान सवयीमुळे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकतो. रोजच्या अशा काही नकळत सवय असतात जेणेकरून आपल्या मधुमेहाचा धोका अनेक पटीने वाढणायची शक्यता असते.
ज्या लोकांना आधीपासून मधुमेह आहे त्या लोकांनी तर प्रत्येक लहानात लहान गोष्टींची दैनंदिन जीवनात काळजी घेणे महत्त्वाचे असते.
1.पांढऱ्या ब्रेडचे सेवन करू नये
आपल्या इथे बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात पांढऱ्या ब्रेडचे सेवन केले जाते. या ब्रेड मध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण खूप लवकर वाढते. म्हणून शक्यतो मधुमेह (Diabetes) रुग्णांनी पांढऱ्या ब्रेडचे सेवन टाळणे गरजेचे आहे अन्यथा त्यांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होईल. याऐवजी तुम्ही रोज सकाळच्या नाश्ता हेल्दी आहार घेणे गरजेचे आहे.
2. नाश्ता वगळण्याची सवय धोकादायक ठरू शकते
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनाना जास्त वेळ पोट रिकामे न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह रुग्णांनी वेळोवेळी आहार घेतले पाहिजे. रात्री आठ ते दहा तासानंतर सकाळी काही न खाणे आरोग्यासाठी (Health) धोकादायक असू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.जे लोक सकाळचा नाश्ता स्किप करतात त्यांना हा आजार होण्याचा अधिक धोका असतो, असे जनरल ऑफ न्यूट्रिशियन मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात आढळून आले.
3. एका ठिकाणी बसून राहणे
ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी एका ठिकाणी बसून राहणे आरोग्यासाठी धोक्याचे असते. ऑफिसमध्ये सतत एका ठिकाणी बसून राहण्याची सवय अनेक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे शारीरिक हालचाल होणे खूप महत्त्वाचे आहे. 4,75,000 हूण अधिक लोकांवर 2021 मध्ये शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांची आळशी जीवनशैली आणि शारीरिक हालचाल न करता एका ठिकाणी बसून असणाऱ्या लोकांमध्ये टाईप टू मधुमेहाचा धोका 31 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
4. एकटेपणा देखील धोकादायक
दीर्घकाळ एकटेपणामुळे टाईप टू मधुमेहाचा धोका वाढू शकते असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. जे लोक एकटे राहतात इतर कोणाशी त्यांचा जवळचा संबंध नाही. त्यांना टाईप टू मधुमेहाचा धोका जास्त असतो असे डायबेटोलॉजी जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात संशोधकांनी मांडले आहे.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.