या 5 सामान्य चुकांचा पचनक्रियेवर होतो वाईट परिणाम !

आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांगतात की, रोजच्या काही सामान्य चुका आपल्या पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम करतात. या चुका सुधारल्या तर औषधांवर पैसे न खर्च करता पचनक्रिया सुधारता येते.
या 5 सामान्य चुकांचा पचनक्रियेवर होतो वाईट परिणाम !
DigestionSaam Tv

शरीरातील आतडे नीट असतील तर आपले आरोग्यही नीट राहते हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. पचनक्रिया (Digestion) व्यवस्थित होण्यासाठी आहार आणि शारीरिक हालचालींचा जितका मोठा वाटा आहे, तितकाच आपल्या रोजच्या सवयीचा विचार करणे गरजेचे असते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांगतात की, रोजच्या काही सामान्य चुका आपल्या पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम करतात. या चुका सुधारल्या तर औषधांवर पैसे न खर्च करता पचनक्रिया सुधारता येते.

1. खाल्ल्यानंतर आंघोळ करणे:

आयुर्वेदानुसार मनुष्याच्या प्रत्येक क्रियेसाठी एक विशिष्ट वेळ सांगितली आहे. ती वेळेवर पूर्ण न केल्याने आपल्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, अन्न खाल्ल्यानंतर सुमारे दोन तास अंघोळ करणे टाळले पाहिजे. शरीरात असलेले Fire Elements अन्न पचवण्यास मदत करतात. हे घटक, खाल्ल्यानंतर आपोआप सक्रिय होतात आणि पचनक्रियेसाठी रक्ताभिसरण वाढवतात. पण जेवल्यानंतर आंघोळ केल्यास शरीराचे तापमान कमी होते आणि पचनक्रिया मंदावते.

Digestion
चिनी मोबाईल कंपनी Xiaomi विरुद्ध ED ची मोठी कारवाई! जप्त केले 5,551 कोटी

2) खाल्ल्यानंतर चालणे:

चालणे हा शरीरासाठी खूप चांगला व्यायाम मानला जातो. पण जेवल्यानंतर लगेच चालणे पचनासाठी हानिकारक ठरू शकते. डॉ. भावसार म्हणतात, चालणे, पोहणे किंवा व्यायाम, या सर्व वात वाढवणाऱ्या क्रिया आहेत ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात. यामुळे पोट फुगणे, पोषण शोषण कमी होणे आणि खाल्ल्यानंतर अस्वस्थता येऊ शकते.

3) दुपारचे जेवण दोन वाजल्यानंतर करणे:

तुम्हाला माहीत आहे का की जेवणाची एक ठराविक वेळ ठरलेली असते. आयुर्वेदात सांगितले जाते की, सूर्य डोक्यावर असताना दुपारी १२ ते २ या वेळेत कधीही दुपारचे जेवण घ्यावे. हा दिवसाचा काळ असतो जेव्हा पित्ताचे प्राबल्य असते, जे अन्न सहज पचण्यास मदत करते. यामुळेच आयुर्वेदात दुपारचे जेवण खूप महत्वाचे आहे असे सांगितले आहे तसेच या दरम्यान तुम्ही पोटभर जेवू शकता.

4) रात्री दही खाणे:

दही खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, पण दही रात्री कधीही खाऊ नये. तज्ज्ञांच्या मते, दह्याच्या आंबट-गोड चवीमुळे शरीरातील वात आणि पित्तदोष वाढते. रात्रीच्या वेळी, कफ नैसर्गिकरित्या शरीरात प्रबळ असतो आणि अशा वेळी दही खाल्ल्याने ते खूप वाढते. हे केवळ आपल्या आतड्यांमध्येच जमा होत नाही तर यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील निर्माण करते.

5) जेवल्यानंतर लगेच झोपणे;

रात्री जेवल्यावर लगेच झोपण्याची चूक कधीही करू नये. आयुर्वेदानुसार रात्री खाणे आणि झोपणे यामध्ये सुमारे तीन तासांचे अंतर असावे. तज्ञ म्हणतात, 'झोपेच्या वेळी आपले शरीर दुरुस्त होते. तर मेंदू दिवसभरातील विचार, भावना आणि अनुभव पचवत असतो. जेव्हा शरीरातील ऊर्जेचे रूपांतर शारीरिक पचनामध्ये (Physical Digestion) होते, तेव्हा मानसिक पचन प्रक्रिया (Mental Digestive Process) थांबते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.