Blood Cleansing Food : 'ही' 5 लक्षणे सांगतील शरीरातील जमा झालेल्या घाणरेड्या रक्ताबद्दल, 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

Food : खराब रक्त अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते. अशातच तुम्ही तुमच्या रक्ताचे शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
Blood Cleansing Food
Blood Cleansing Food Saam Tv

Blood Cleansing Food : आजकाल अनेक व्यक्ती वेगवेगळ्या केमिकल पदार्थांचे सेवन करत असतात. अशा गोष्टी सेवनात आल्याने शरीरातील रक्त खराब होण्याचे प्रमाण वाढते. खराब रक्त अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकते. अशातच तुम्ही तुमच्या रक्ताचे शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्त शुद्ध करण्यासाठी काय करायला हवे हे आज आधी तुम्हाला सांगणार आहे.

हेल्दी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही जे खाता पिता त्याचा सरळ परिणाम तुमच्या स्वास्थ्यावर होतो. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे रसायने ऊपलब्ध असतात. जे हळू हळू तुमच्या रक्तामध्ये मिसळतात. हे विषारी पदार्थ रक्तामध्ये घुसून नसांना डॅमेज करू शकतात. सोबतच कोलेस्ट्रॉलचा खतरा वाढवू शकतात, लिवर खराब करू शकतात आणि इन्फेक्शन निर्माण करू शकतात.

Blood Cleansing Food
High Blood Pressure : हाय बिपीमुळे त्रस्त आहात? तर काकडीचा रस प्या, हृदयासाठी ठरेल फायदेशीर !

रक्त शुद्ध कसे करावे ? भारताची (India) प्रसिद्ध न्यूट्रिशनीस्ट अंजली मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, चांगल्या आरोग्यासाठी रक्ताचे शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तामध्ये उपलब्ध असलेली घाण तुमच्या अंतर आणि बाह्य अंगाना नुकसान पोहोचवू शकते. रक्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

1. रक्त खराब होण्याची लक्षणें :

रक्तामध्ये उपलब्ध असणारे घाणेरडे पदार्थ blood poisoning ला बळी पडतात. याचा अर्थ म्हणजे तुमच्या शरीरामधील खराब रक्त वेळेस साफ केलं नाही तर, रक्तामध्ये विषारी पदार्थ तयार होऊन तुमच्या पूर्ण शरीरामध्ये विष पसरू शकते. रक्त खराब झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची लक्षणे (Symptoms) आढळून येतील :

1. तीव्र ताप

2. हार्टबीट वाढणे

3. श्वासोच्छवासाचा अडथळा निर्माण होणे

4. त्वचेवरती लाल खुणा दिसणे.

Blood Cleansing Food
Low Blood Pressure : मीठाचे सेवन ठरु शकते लो ब्लड प्रेशरसाठी फायदेशीर, डॉक्टरांनी दिली माहिती

या पदार्थांचे सेवन करा

1. हिरव्या पालेभाज्या :

तुम्हाला तुमच्या आहारामध्ये ब्रोकोली आणि पालक सारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. या भाज्यांमध्ये आयरन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

2. संत्र्याचा रस :

संत्र्याच्या ज्यूसमध्ये, मनुके आणि मधामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि प्रोटीन उपलब्ध असते. या सगळ्या पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे रक्त शुद्ध होते आणि तुम्ही त्यांच्या कमीपासून वाचता.

Blood Cleansing Food
Control Blood Sugar : ब्लड शुगरला रोखण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी 'हे' काम करायलाच हवे

3. वीटग्रास ज्यूस :

जर तुम्हाला पहिल्यापासूनच रक्तसंबंधीत कोणती अडचण असेल, किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया असेल तर, तुम्ही विटग्रास ज्यूसचं सेवन केलं पाहिजे. याशिवाय टोफू आणि राजमा सुद्धा भरपूर असतात. ज्यामुळे रक्तामधील हिमोग्लोबिन लेवल वाढण्यास मदत होते.

4. सफरचंद :

सफरचंद (Apple) या फळामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयरन, आणि अनेक प्रकारचे विटामिन्स भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. नियमितरित्या हर्षदा चे सेवन केल्यास शरीरामधील खराब रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते. अशातच सफरचंद या फळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर उपलब्ध असते. जे शरीरामधील जड धातूंना बाजूला करण्यासाठी मदत करतात. व्हिटॅमिन सी सारखे अँटिऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सला करण्यासाठी मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com