Parenting Tips : तुमच्या मुलांच्या 'या' वाईट सवयी करु शकतात मानसिक आरोग्यावर परिणाम!

Bad Habits Of Kids : लहान मुलं मोठ्या माणसांसारखे ओवरएक्सप्रेसिव नसतात.
Parenting Tips
Parenting Tips Saam Tv

Mental Health Of kids : लहान मुलं मोठ्या माणसांसारखे ओवरएक्सप्रेसिव नसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या मनात नेमके काय चालले आहे हे ओळखायला कठीण जाते आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी देखील अडथळा निर्माण होतो. अशा अनेक पद्धती आहेत ज्यामुळे मुलं त्यांची असहजता आणि समस्येला दाखवू शकतात.

बऱ्याचदा पालक त्यांच्या लहान मुलांच्या ताणतणावाकडे एवढे लक्ष देत नाहीत. त्यांच्या स्ट्रेसला नजरअंदाज केले जाते. परंतु याच गोष्टीमुळे तुमच्या मुलांना मानसिक समस्या होऊ शकते. जर तुम्ही सुद्धा पालक आहात तर, तुमच्या मुलांच्या (Children) मेंटल हेल्थ (Health) प्रॉब्लेमचे संकेत तुम्हाला समजून येतील.

Parenting Tips
Parenting Tips : मुलांच्या हट्टीपणाचा तुम्हाला राग येतो ? मग अशा पद्धतीने ठेवा रागावर नियंत्रण !

सतत दुखी राहणे -

दुखी राहणे आणि सतत दुखी राहणे या दोन गोष्टींमध्ये हलकासा फरक आहे. दुखी राहणे फक्त काही वेळा पुरतेच असते आणि सतत दुखी राहणे याला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त आठवडा लागतो. लगातार दुःखी असल्यामुळे लहान मुलांना डिप्रेशन ही समस्या होऊ शकते.

सतत दुखी असल्याने दररोजच्या कामांमध्ये देखील लक्ष लागत नाही. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि ही गोष्ट लहान मुलांच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी अजिबात चांगली नाही आहे.

स्वभाव आणि मूडमध्ये बदल -

मेंटल हेल्थपासून झगडत असलेल्या मुलांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होतात. यामुळे त्याच्या व्यवहारांमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आणि तुमचे मूल भरपूर चिडचिडे देखील होऊ शकते. असे असू शकते की, तुमचे मुलं स्वतःलाच त्रास देत आहे. सोबतच तुम्हाला तुमचा मुलगा भरपूर दुखी, त्रास देणारा वाटेल.

Parenting Tips
Parenting Tips : परीक्षेच्या काळात मुलांना ताण येतो 'या' टिप्स फॉलो करा

दुर्लक्ष करण्याची सवय -

जेव्हा तुमची मुले सोशल लाईफ पासून दूर राहत असतील आणि मित्र-मैत्रिणी सोबत देखील जास्त संवाद साधत नसतील तर, हे लक्षण तुमच्या मुलांच्या कुठल्यातरी समस्येच आहे. हा स्वभाव बदलण्यासाठी प्रत्येक मुलगा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो.

लहान मुलं कोणत्याही परिस्थिती सोबत फाईट करू शकत नाही. अशातच मोठी मुले येणाऱ्या परिस्थितीला त्यांच्या पद्धतीने हॅण्डल करण्याचे पाहतात.

आत्महत्येबद्दल बोलणे -

जेव्हा लहान मुलं किंवा कोणताही व्यक्ती आत्महत्या बद्दल बोलत असेल तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. जर तुमचा मुलगा लगातार आत्महत्या बद्दल बोलत असेल, की मी आता मरणार आहे तर, तुम्ही या गोष्टीकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे.

तुमच्या मुलाला नेमका कोणता प्रॉब्लेम आहे याची पडताळणी केली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलांना असं ही बोलू शकता की, माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे, तू मरणाच्या गोष्टी करू नकोस. असं म्हटल्याने तुमच्या मुलाला जरासा दिलासा वाटेल.

शारीरिक लक्षण -

प्रत्येक व्यक्तीमध्ये मेंटल हेल्थ प्रॉब्लेमचे शारीरिक लक्षणे असतात. अशा मुलांना डोकेदुखी, पोट दुखी आणि थकवा जाणवू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com