
Best Honeymoon Destination : सध्या लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. अशातच सगळीकडे मंगलमय वातावरण पसरलेलं पाहायला मिळतय. अनेक जोडपे एकमेकांसोबत लग्न गाठ बांधण्यासाठी आतुर झाले आहेत आणि लग्न झालेले जोडपे हनीमुनच्या तयारीमध्ये आहेत.
1. लक्षद्विप :
जर तुम्हाला तुमच्या पार्टनर (Partner) सोबत एखाद्या रोमांटिक डेस्टिनेशनवर जाऊन हनिमून सेलिब्रेट करायचे असेल तर, तुम्ही लक्षदीपि येथे जाऊ शकता. लक्षदीप येथे फिरण्यासाठी लक्षदीप मिनीकॉय द्वीप, बांगरम द्वीप, कारवत्ती द्वीप, मरीन संग्रहालय, कदमत आयलँड या ठिकाणी जाऊ शकता.
2. वयनाड :
तुम्ही हनीमून सेलिब्रेशनसाठी केरला येथे जाऊ शकता. केरळ हे प्राकृतिक सुंदरतेसाठी संपुर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याला हनीमून, बेबीमुन आणि प्रे वेडिंग डेस्टिनेशन सुद्धा म्हटले जाते. यासाठी तुम्ही वायनाड येथे जाऊ शकतात. वायनाड अतिशय सुंदरतेने नटलेलं ठिकाण आहे. सोबतच संपूर्ण जगभरातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे.
3. हंपी :
कपल्ससाठी हंपी हे एक आकर्षण केंद्र आहे. मोठ्या संख्येमध्ये लोक हंपी येथे फिरायला जातात. सोबतच तुम्ही हनिमून सेलिब्रेशन करण्यासाठी हंपी येथे जाऊ शकतात. या महिन्यांमध्ये हंपीचे वातावरण अतिशय आनंदी असते.
4. कश्मीर :
कश्मीर या ठिकाणाला जगामधील धरतीवर असलेले स्वर्ग मानले जाते. कश्मीरमध्ये फिरण्यासाठी अनेक प्रमुख स्थळ आहेत. तुम्ही तुमच्या हनीमुनला अविस्मरणीय बनवण्यासाठी कश्मीरला जाऊ शकता. खासकरून मार्च महिन्यामध्ये ट्युलीप गार्डन फिरू शकता. सोबतच डल झिलवर बोटीचा आनंद घेऊ शकता.
5. गोवा :
गोवा पर्यटकांसाठी प्रमुख स्थळ मानले जाते. प्रत्येक ऋतूमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून गोवा फिरण्यासाठी येतात. तुम्ही तुमच्या हनिमून सेलिब्रेशनसाठी गोवा हे ठिकाण निवडू शकता. तूम्ही तुमच्या पार्टनरसोबत गोव्यावरील बीचचा आनंद लुटू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.