Best Motorcycles for Students: कॉलेज स्टूडेंटच्या मनावर राज्य करतात या 3 मोटारसायकली, 160 CC सेगमेंटसह देतात दमदार परफॉर्मन्स

Best Two-Wheelers for College Students: जर तुम्हीही कमी किमतीत उत्तम बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Favorite Motorcycles Of College Students
Favorite Motorcycles Of College StudentsSaam Tv

Bikes For College Students : जर तुम्हीही कमी किमतीत उत्तम बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या देशात कमी बजेटमध्ये अनेक दमदार मोटारसायकली उपलब्ध आहेत, ज्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने उत्तम आहेत तसेच लूकमध्ये स्टायलिश आहेत. चला जाणून घेऊया त्या मोटरसायकलबद्दल.

160 CC मध्ये येणार्‍या बाईक (Bike) दैनंदिन वापरासाठी आहेत, त्या शहर किंवा महामार्गावरील राइडसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. कारण तुम्ही ही बाईक कमी वापरली तरी महागड्यां गाड्यांच्या किमतीत जास्त सीसीची बाईक तुम्हाला कमी मायलेज देऊ शकते. 160 CC सेगमेंटमध्येही कामगिरी मजबूत असते. त्यामुळे कॉलेजचे (College) विद्यार्थीही या बाईक घेऊ शकतात.

Favorite Motorcycles Of College Students
Honda Two-Wheelers : होंडाची ग्राहकांना नवी ऑफर ! बाईक खरेदी केल्यानंतर मिळणार 10 वर्षांची गँरटी...

TVS Apache RTR 160

Apache RTR 160 ची प्रारंभिक दिल्ली एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,20,000 रुपयांपासून सुरू होते. TVS Apache RTR 160 मध्ये 159.7cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8500 rpm वर 15.8hp पॉवर आणि 6000 rpm वर 13Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास कॅपेबल आहे.

TVS Apache RTR 160 4V

TVS Apache RTR 160 4V ABS ची प्रारंभिक दिल्ली एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,27,000 हजार रुपये आहे. नवीन TVS Apache RTR 160 4V मध्ये 159.7cc सिंगल-सिलेंडर, 4-व्हॉल्व्ह, ऑइल-कूल्ड इंजिन आहे, जे 16.8hp पॉवर आणि 14.8Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याच वेळी, ही बाईक तिच्या इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

Favorite Motorcycles Of College Students
Waterproof Cover For Two Weeler : काय सांगता ! पावसात घेता येईल बाईक राईडचा आनंद ? या वॉटरप्रूफ कव्हरने होईल तुमचे संरक्षण, आजच खरेदी करा

Bajaj Pulsar NS160

बजाज पल्सर NS160 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1,34,675 रुपयांपासून सुरू होते. बजाज पल्सर NS160 मध्ये पॉवरसाठी, 160.3 cc ऑइल-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 4-व्हॉल्व्ह DTS-i इंजिन दिले गेले आहे, जे 8500 rpm वर 15.5PS ची कमाल पॉवर आणि 6500 rpm वर 14.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com