Relationship tips : लग्नाच्यापूर्वी आपल्या जोडीदारासोबत या गोष्टी डिस्कस करा, नाते होईल आणखी घट्ट

लग्नापूर्वी जोडीदाराशी कोणत्या गोष्टीवर चर्चा कराल ?
Things To Discuss Before Marriage, Relationship Tips
Things To Discuss Before Marriage, Relationship Tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्याला हव्या तशा जोडीदाराची निवड केल्यानंतर आपण लग्नाल सहमती देतो. लग्न हे आयुष्यातील सर्वात पवित्र नाते मानले जाते आणि हा निर्णय जीवनातील सर्वात मोठा निर्णय देखील आहे.

हे देखील पहा -

लग्नासाठी घाई करणे चांगले नाही किंवा कोणत्याही नात्याला एका झटक्यात हो म्हणणे योग्य नाही. आपापसात विचार करून आणि बोलूनच हा निर्णय घ्यावा. लग्न जुळवलेले असो किंवा प्रेम, काही गोष्टींवर आपण आपल्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलायला हवे. प्रेमविवाहात या समस्या कमी असतात परंतु, अरेंज मॅरेजमध्ये या गोष्टींचा त्रास लग्न करणाऱ्या जोडप्यांना अधिक होतो. लग्नाधी अनेक गोष्टींवर जोडीदारासोबत (Partner) चर्चा करणे अधिक आवश्यक असते. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेऊया.

१. प्रत्येक कुटुंबाच्या स्वत:च्या प्रथा असतात ज्यासाठी आपण लग्नाधी त्याबद्दल जाणून घ्यायला हवे. प्रत्येकांच्या घरातील चालीरितीबद्दल समजून घेणे व त्याबद्दल समाजावून सांगणे व त्यावर चर्चा करायला हवी.

Things To Discuss Before Marriage, Relationship Tips
Health tips : फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या या पदार्थाचे आरोग्याला होतील अद्भूत फायदे जाणून घ्या

२. जर आपले लग्न ठरले असेल तर आपण आर्थिक बाबींवर चर्चा करायला हवी. आपले करिअर व पैसे यांबाबत जोडीदाराचे मत जाणून घ्या.

३. लग्नापूर्वी जोडीदारासोबत कुटुंब नियोजनावर चर्चा करणे खूप गरजेचे आहे. मुले व त्यांचे संगोपन कसे होईल, मुलांमध्ये किती अंतर असेल, इत्यादी गोष्टींवर आगाऊ चर्चा करणे योग्य ठरेल.

४. लग्नाआधी एकमेकांच्या स्वभावाविषयी आणि स्वभावाबद्दल नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या सवयी आणि गरजा जाणून घेतल्यास संबंध चांगले राहतील.

५. लग्नानंतर नोकरी आणि वेळेचा प्रश्न येतो तेव्हा नात्यात तणाव (Stress) निर्माण होतो. यासाठी त्यांच्याशी आधीच चर्चा करा. लग्नानंतर असे अनेक प्रसंग येतात. ज्यामध्ये आपण आपल्या जोडीदाराला नाव ठेवतो त्यासाठी आपण या गोष्टींवर बसून चर्चा करायला हवी.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com