Hypothyroidism : हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय ? 'या' व्यक्तींना होऊ शकतो 'हा' आजार, लक्षणे दिसल्यास वेळच व्हा सावध!

हायपोथायरॉईडीझम हा एक सामान्य आजार आहे.
Hypothyroidism
Hypothyroidism Saam Tv

Hypothyroidism : हायपोथायरॉईडीझम हा एक सामान्य आजार आहे, ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार करू शकत नाही. हायपोथायरॉईडीझमचा धोका स्त्रियांमध्ये (Women) अधिक आढळतो, मुख्यतः स्वयंप्रतिकार विकारांमुळे. हायपोथायरॉईडीझममध्ये, एखाद्या व्यक्तीला झोप न लागणे आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसू शकतात. हायपोथायरॉईडीझम शोधण्यासाठी, आपण नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. जाणून घेऊयात कारणे (Health)

Hypothyroidism
Thyroid : थायरॉईड नियंत्रीत ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात करा

हायपोथायरॉईडीझमची सामान्य कारणे -

ग्रेव्हस रोग -

ग्रेव्हज हा एक प्रकारचा ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे ज्यामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती अँटीबॉडीज बनवते, ज्यामुळे थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन वाढते.

थायरॉइडायटिस -

थायरॉइडाइटिस म्हणजेच थायरॉईड ग्रंथीवर सूज येणे हे देखील हायपोथायरॉइडिझमचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणेनंतर महिलांमध्ये थायरॉईडाइटिसचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्या हायपोथायरॉईडीझमच्या बळी ठरतात.

हायपोथायरॉईडीझमची इतर कारणे -

- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, औषधांच्या अतिसेवनाने हायपोथायरॉईडीझमचा धोका वाढतो.

- आयोडीनचा जास्त वापर केल्याने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

Hypothyroidism
Thyroid Cancer : तरुणांमध्ये वाढतो आहे थायरॉईड कर्करोगाचा आजार, वेळीच सावध व्हा !

हायपोथायरॉईडीझमचे मुख्य जोखीम घटक -

हायपोथायरॉईडीझम टाळण्यासाठी, त्याचे जोखीम घटक जाणून घेणे फार महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखू शकाल आणि योग्य उपचार घेऊ शकाल.

– महिलांना हायपोथायरॉईडीझमचा धोका जास्त असतो

– स्वयंप्रतिकार रोगांनी ग्रस्त

– कुटुंबात हायपोथायरॉईडीझम किंवा थायरॉईडचा इतिहास असणे

– गर्भधारणा

– धूम्रपान

– आयोडीनयुक्त औषधांचे जास्त सेवन

– शरीरात व्हिटॅमिन डी आणि सेलेनियमची कमतरता

– मानसिक तणाव आणि नैराश्य

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com