Control To Hair Fall : केसगळती रोखण्यासाठी हे तेल ठरेल फायदेशीर!

Hair Fall Problem : कॅस्टर ओईलला त्याच्या ब्युटी बेनिफिट्समुळे ओळखले जाते.
Control To Hair Fall
Control To Hair FallSaam Tv

Hair Fall Problem Solution : कॅस्टर ओईलला त्याच्या ब्युटी बेनिफिट्समुळे ओळखले जाते. दीर्घकाळ बऱ्याच कंपन्या सुद्धा कॅस्टर ओईलचा वापर कॉस्मेटिक प्रोडक्ट बनवण्यासाठी करतात. हे तेल थोडं घट्ट आणि चिपचिप असतं. हे तेल त्वचेवर लावल्या बरोबर थोडं जड वाटू शकत. परंतु हे तेल लगेच त्वचेमध्ये मुरते. सोबतच या तेलामध्ये अनेक प्रकारचे प्रोटीन्स, विटामिन आणि मिनरल्स उपलब्ध असतात.

हे ऑइल (Oil) अतिशय हायड्रेटिंग असते. सोबतच तुमच्या डोक्याच्या चमडीवरील ब्लड सर्कुलेशन वाढते. सोबतच हेअर फॉल थांबवण्यासाठी हे तेल अतिशय फायदेशीर ठरते. हे एक हार्श केमिकल असल्यामुळे केसर डॅमेज होण्यापासून वाचवते. कॅस्टर ओईलचे आपल्या त्वचेला (Skin) अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊ कॅस्टर ऑइलचे फायदे.

Control To Hair Fall
Hair Fall Problems : केस कोरडी होऊन सतत तुटताय? केसगळतीवर अंड ठरेल रामबाण!

कॅस्टर ओईल आणि कडुलिंबाचे तेल -

कडुलिंबाचे तेल केसांसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. तुम्ही हे तेल कॅस्टर ओईल सोबत मिक्स करून लावू शकता.

आवश्यक सामग्री -

* कडुलिंबाच्या तेलाचे दोन थेंब

* कॅस्टर ओईल एक चमचा

वापरण्याची पद्धत -

हे तेल बनवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी कडुलिंबाच्या तेलाला आणि कॅस्टर ओईलला मिक्स करा. आता हे तेल तुम्ही तुमच्या केसांना लावा. आता तुम्ही केसांना हॉट टॉवेल किंवा स्टीमरच्या मदतीने स्टीम द्या. अर्धा तास झाल्यानंतर केस धुऊन टाका.

त्याचबरोबर नारळाचे तेल आणि कॅस्टर ओईल सुद्धा मिक्स करून तुम्ही केसांना लावू शकता. यासाठी तुम्हाला कॅस्टर ओईल आणि नारळाचे तेल लागेल. हे तेल बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला नारळाच्या तेलाला हलके गरम करून घ्यावे लागेल.

आता तुम्ही या तेलामध्ये कॅस्टर ओईल मिक्स करून एक दोन काड्या लवंग टाकू शकता. या मिश्रणासोबत तुम्ही तुमच्या डोक्याचा मसाज करा. आता तुमच्या केसांना स्टीम देऊन वीस मिनिटानंतर केस धुवून टाका.

कॅस्टर ओईल सोबत ग्लिसरीन मिक्स करा -

ग्लिसरीनचे आपल्या त्वचेला अनेक प्रकारचे फायदे होतात. म्हणूनच तुम्ही ग्लिसरीन कॅस्टर ओईल सोबत मिक्स करून लावू शकता. अशातच ग्लीसरीन आणि कॅस्टर ओईल हे दोन्ही तेल घट्ट असतात त्यामुळे तुम्ही त्यामध्ये कोकोनट ऑइल मिक्स करू शकता.

आवश्यक सामग्री -

* एक चमचा कॅस्टर ओईल

* एक चमचा कोकोनट ऑइल

* अर्धा चमचा ग्लिसरीन

वापरण्याची पद्धत -

सर्वात आधी तुम्ही नारळाचे तेल गरम करून घ्या. त्यानंतर नारळाच्या तेलामध्ये कॅस्टर ओईल आणि ग्लिसरीन मिक्स करा. आता हे मिश्रण तुम्ही तुमच्या डोक्याला लावून केसांना चांगलीच स्टीम द्या. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुऊन टाका.

Control To Hair Fall
Hair Falls Problem: वजन कमी तर होतेच पण केसगळतीची समस्या अधिक का? जाणून घ्या कारण

कॅस्टर ओईल सोबत बदामाचे तेल मिक्स करा -

बदामामध्ये उपलब्ध असणारे विटामिन ई हे तुमच्या केसांची ग्रोथ वाढवण्यास मदत करते. तुम्ही बदामाचे तेल कॅस्टर ओईल सोबत मिक्स करू शकता.

आवश्यकता सामग्री -

* आठ ते दहा थेंब बदामाचे तेल

* एक चमचा कॅस्टर ओईल

* दोन थेंब कडुलिंबाचे तेल

वापरण्याची पद्धत -

सर्वप्रथम तुम्ही कॅस्टर ओईलमध्ये बदामाचे तेल आणि कडुलिंबाचे तेल घालून मिक्स करा. त्यानंतर तुम्ही हे तेल तुमच्या डोक्यावर लावून पंधरा ते वीस मिनिटे मसाज करा. त्यानंतर केसांना शाम्पू करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com