New Year Smartphone offers: नवीन वर्षात होतायत 'हे' स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

नवीन वर्षात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.
New Year 2023
New Year 2023Saam Tv

New Year offers: नवीन वर्षात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. जाणून घ्या काही उत्तम स्मार्टफोन्सबद्दल जे नवीन वर्षात तुमच्यासाठी बजेट, प्रीमियम रेंजमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

अवघ्या एका दिवसानंतर जगभरात नवीन वर्ष साजरे होणार आहे. नववर्षाच्या मुहूर्तावर स्मार्टफोन कंपन्या अनेक मोबाईल फोन सादर करणार आहेत. नवीन वर्षात बजेट रेंज, मिडरेंज आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये अनेक मोबाईल लॉन्च केले जातील.

जर तुम्ही नवीन वर्षात स्वतःसाठी एक चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या नवीन वर्षात कोणते मोबाईल लॉन्च होणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील.

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचा स्मार्टफोन असा असावा की त्यात मजबूत बॅटरी, उत्तम कॅमेरा, चांगली मेमरी आणि अद्वितीय डिझाइन असेल. अशा परिस्थितीत जाणून घ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी कोणता फोन चांगला असू शकतो.

New Year 2023
Smartphone Tips : तुमचा फोन स्लो चालतोय का? तर या असू शकतात समस्या

Samsung Galaxy S23 -

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपली S23 सीरीज फेब्रुवारीमध्ये अनावरण करू शकते. या अंतर्गत कंपनी 3 स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. पहिला Samsung Galaxy S23, दुसरा Samsung Galaxy S23 Plus आणि तिसरा Samsung Galaxy s20 Ultra आहे. सॅमसंगचे स्मार्टफोन Android 13 आणि क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 ऑक्टा कोर प्रोसेसरसह, 5000mah ची शक्तिशाली बॅटरी आणि 200-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह सुसज्ज असतील.

OnePlus 11 5G -

OnePlus फोनची वाट पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी नवीन वर्षात OnePlus 11 5G लाँच करणार आहे. हा फोन भारतात फेब्रुवारीमध्ये लॉन्च केला जाईल तर चीनमध्ये 4 जानेवारीला सादर केला जाईल. या मोबाईल फोनमध्ये वर्तुळाकार कॅमेरा दिसेल आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.

OnePlus 5G ची किंमत सुमारे 70,000 रुपये असू शकते. मात्र त्याची नेमकी माहिती लॉन्च झाल्यानंतरच समोर येईल. OnePlus 11 5G दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये 12/256GB आणि 16/512GB चा समावेश आहे.

New Year 2023
Smartphone : लॉन्च होण्यापूर्वी Samsung Galaxy S23 चा फोटो लीक, पहा लुक आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone2 -

नथिंग कंपनीच्या नथिंग फोन 1 ने या वर्षी खूप मथळ्या केल्या. लोकांना हा पारदर्शक फोन खूप आवडला आणि आता कंपनी नवीन वर्षात नथिंग फोन टू लॉन्च करू शकते. या मोबाईल फोनची किंमत सुमारे 40,000 रुपये असू शकते आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 प्रोसेसर यामध्ये मिळू शकतो. नथिंग फोन 2 मध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसेल.

Google pixel 7a आणि 8 -

गुगलचे स्मार्टफोन चांगल्या कॅमेरा क्वालिटी आणि अँड्रॉइडच्या उत्तम अनुभवासाठी लोकांमध्ये ओळखले जातात. कंपनी नवीन वर्षात Google Pixel 7A आणि 8 लाँच करू शकते. Google Pixel च्या नवीन स्मार्टफोनमध्ये HDR Plus फोटोग्राफी सपोर्ट मिळू शकतो.

iPhone 15 -

असे मानले जात आहे की Apple नवीन वर्षात iPhone 15 लाँच करू शकते. या मोबाईल फोनमध्ये राहणारी सर्वात खास गोष्ट म्हणजे टाइप सी चार्जिंग. खरं तर, युरोपियन युनियनच्या निर्णयानंतर, मोबाइल कंपन्यांना स्मार्टफोनमध्ये टाइप सी चार्जिंग पोर्ट प्रदान करणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत, आयफोन 15 उत्कृष्ट फीचर्स तसेच टाइप सी चार्जिंगसह येऊ शकतो. तथापि, काही तंत्रज्ञान तज्ञांचे मत आहे की टाइप-सी पोर्ट येण्यास वेळ लागेल.

हे स्मार्टफोनही लॉन्च केले जातील -

या स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Vivo x90 Pro, Xiaomi 13 Pro, IQOO 11pro आणि Jio स्मार्टफोन देखील नवीन वर्षात लॉन्च केले जाऊ शकतात.

लक्षात ठेवा, हे सर्व स्मार्टफोन नवीन वर्षात वेगवेगळ्या वेळी लॉन्च केले जातील. त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमतीत बदल शक्य आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com