Fasting Recipe : सतत साबुदाणा खाऊन वैतागले आहात? 'या' उपवासाच्या रेसिपी ट्राय करुन पाहा

Recipe : अनेक व्यक्तींना उपवासादरम्यान सफेद मिठ आणि सैंधव मिठ खायचे नसते.
Fasting Recipe
Fasting RecipeSaam Tv

Fasting Recipe : अनेक व्यक्तींना उपवासादरम्यान सफेद मिठ आणि सैंधव मिठ खायचे नसते. अशावेळी तुम्ही उपवासासाठी बिनामिठाची चविष्ट रेसीपी घरच्या घरी बनवु शकता.

फळांपासून तुम्ही न मिठ टाकता अनेक प्रकारच्या रेसीपी बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसीपी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला उपवासाच्या दिवशी चांगले, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ खाता येतील.

Fasting Recipe
Fasting Benefits : आठवड्यातून एकदा उपवास केल्यास बॉडी होऊ शकते क्लीन? जाणून घ्या त्याचे परिणाम

मखाना मिल्क -

तुम्हाला दुध (Milk) पिण्यास आवडत असेल तर, तुम्ही मखाण्याचे दुध बनवुन पिऊ शकता. हे दुध बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी दोन कप मखाने, अर्धा किलो ग्राम दुध, दोन चमचे साखर आणि दोन चमचे शुद्ध गाईचे तूप.

बनवण्याची पद्धत -

सर्वात आधी गॅसवर (Gas) पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये मखाने चांगले भाजून घ्या. आता मखाण्यांना एका डिशमध्ये काढून थंड करून घ्या. आता हे मखाणे जाडसर कुटून घ्या आणि दुध उकळल्यानंतर त्यामध्ये मखाने आणि साखर घालून चांगले शिजवून घ्या. आता गॅस बंद करून घट्ट मखाण्याची खीर गरमागरम सर्व करा.

Fasting Recipe
Fast Eating Side Effects : घाईघाईत खाण्याच्या सवयीमुळे तुम्ही आजारी पडू शकता, आजच घ्या काळजी

उपवासासाठी बनवा दह्याचे बटाटे -

उपवसामध्ये तुम्ही मिठ न वापरता चटपटीत बटाटे बनवू शकता. यासाठी तुम्हाला दही, उकळलेले बटाटे, भाजलेले जिरे, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, काळी मिरी पूड, लाल तिखट, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि लिंबू या सगळ्या सामग्रीची गरज दह्याचे बटाटे बनविण्यासाठी लागणार आहे.

बनवण्याची पद्धत -

जर तुम्ही उपवासासाठी ही रेसीपी बनवत असाल तर, सर्वात आधी बटाटे स्मॅश करुन घ्या. त्यानंतर त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, आमचूर पावडर, काळी मिरी पूड या सगळ्या गोष्टी घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण दह्यामध्ये मिक्स करून सर्व करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com