
Masala Kanda Roti : तुम्ही सगळ्यांनीच आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या, नान, चपाती नक्कीच ट्राय केल्या असतील. अशातच तुम्ही मसाला रोटी देखील बनवु शकता. ब्रेकफास्टमध्ये मसाला कांदा रोटी बनवली जाऊ शकते.
तुम्ही नाष्टामध्ये मराठी खाऊन बोर झाला असाल तर ही मसाला कांदा रोटीची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या नाष्ट्यामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही मसाला कांदा (Onion) रोटी बनवून खाऊ शकता.
मसाला कांदा रोटी बनवण्याची सामग्री -
गव्हाचे पीठ एक कप, अर्धा कप बेसन, तीन ते चार बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, एक टेबलस्पून हिरवी कोथिंबीर, एक टेबलस्पून जीरा, चमचा लाल तिखट, एक चमचा हळद, कांदा लसूण (Garlic) मसाला, तूप आणि चवीनुसार मीठ.
मसाला कांदा रोटी बनवण्याची पद्धत -
चविष्ट मसाला कांदा रोटी बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा बारीक चिरून घ्या. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
त्यानंतर एका वाटीमध्ये बेसनाचे पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करून घ्या.
त्यानंतर यामध्ये जिरे हळद लाल मिरची टाकून सगळे मिश्रण एकजीव करून घ्या.
या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा मिक्स करा.
कांदा मिक्स करून झाल्यानंतर मिश्रणामध्ये दोन चमचे तेल टाका आणि कांदा लसूण मसाला घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.
आता थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मळून घ्या.
पीठ चांगलं मुरण्यासाठी दहा मिनिटे झाकून ठेवा. वेळ झाल्यानंतर पिठाचे बारीक बारीक गोळे करून घ्या.
आता गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. त्यामध्ये चारही बाजूंनी तूप लावून घ्या.
पिठाच्या गोळ्याची रोटी लाटून तव्यावरती शेका. ही रोटी तुम्ही लोणच्याबरोबर ट्राय करू शकता.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.