Diabetes Health Tips : हिवाळ्यात ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी, मधुमेहांनी 'या' टिप्स फॉलो करा

हिवाळ्यामध्ये मधुमेहचा समस्या अधिक वाढत आहेत.
Diabetes Health Tips
Diabetes Health Tips Saam Tv

Diabetes Health Tips : डायबेटिसच्या समस्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात वाढत आहे भारतामध्ये जवळजवळ 77 दशलक्ष लोक डायबेटिस म्हणजेच मधुमेह ग्रस्त आहेत. मधुमेहाचे टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार पडतात.

मधुमेह मुळापासून नष्ट करता येत नाही पण तो नियंत्रित नक्कीच ठेवतात येतो. हिवाळ्यामध्ये मधुमेह चा समस्या अधिक वाढत आहेत. बदलत्या हवामानात मधुमेह (Diabetes) रुग्णांनी स्वतःची जास्ती काळजी घेणे गरजेचे आहे.

हिवाळ्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप वाढत असते तर आज त्या विषयी काही टिप्स (Tips) जाणून घेऊया ज्याने हिवाळ्यामध्ये तुमचं रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

तुमचे हात उबदार ठेवा -

हिवाळ्यामध्ये तापमान खाली जाऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित अडथळे येत असतात त्याचे कारण म्हणजे तुमचे हात थंडे होणे असू शकते अशा परिस्थितीत हातामध्ये हातमोजे घालून तुमचे हात उबदार ठेवणे गरजेचे आहे. जर तुमचे हात उबदार असल्यावर शरीरात रक्त प्रवाह सुरळीत होतो. ब्लड शुगर लेवल नियंत्रित होण्यास मदत होते.

Diabetes Health Tips
Health Tips : तुमच्या दैनंदिन जीवनातील 'या' सवयी बदल्या नाही, तर होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

आवळ्याचे सेवन करा -

आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशी आहे.आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात आवळा खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतो.आवळ्यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असते त्यामुळे रोज दिवसातून दोन वेळा दोन चमचे गुसबेरी पेस्ट पाण्यात मिसळून प्या. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढणार नाही.

विटामिन डी घ्या -

इन्सुलिनच्या निर्मितीसाठी विटामिन डी खूप आवश्यक असते विटामिन डी साठी सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्ही दररोज कमीत कमी 20 ते 30 मिनिट सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. संत्र्याच्या रसामधून सुद्धा तुम्हाला विटामिन डी चांगल्या प्रमाणात मिळते. त्याचे सेवन केल्याने तुम्हाला इतर कोणता आजार असल्यास तोही दूर होईल.

ब्लड शुगर नियमित तपासात राहा -

बदलत्या हवामानाचा परिणाम तुमच्या रक्तातील साखरेवर होतो त्यामुळे तुम्ही नियमित रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहिले पाहिजे. त्यासाठी डॉक्टरचा संपर्कात राहणे फार महत्त्वाचे असते.

Diabetes Health Tips
Diabetes Control Tips : वाढलेलं बल्ड शुगर कसे ओळखाल ? शरीर देते 'हे' 6 महत्त्वाचे संकेत!

मेथीचे पाणी प्या -

मेथी मध्ये अनेक पोषक तत्व असतात त्यामुळे त्याचा आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.तसेच जर तुम्हाला रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर रात्रभर २ चमचा पाण्यात मेथीचे दाने भिजवून सकाळी त्याचे सेवन करा.किंवा याची पावडर बनवून दुधात टाकून पण तुम्ही घेऊ शकता.

पायाची काळजी घ्या -

हिवाळ्यात आपल्याला त्वचेच्या अनेक समस्या होतात त्वचा कोरडी पडते तसेच टाचांना भेगा पडतात जर मधुमेह सोबत होत असेल तर त्यांनी याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या पायात जखमा होण्याचे शक्यता असते त्याचे इन्फेक्शन अधिक वाढल्याने तो अवयव गमवण्याची वेळ येऊ शकते. पायांना काही दुखापत झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com