मावळातील पर्यटन स्थळं कात टाकणार; परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम...

पर्यटकांचे आकर्षण असलेले राजमाची गार्डन, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, वाघजाई पॉईंट, भुशी डॅम परिसरात पाहणी दौरा करण्यात आला.
मावळातील पर्यटन स्थळं कात टाकणार; परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम...
मावळातील पर्यटन स्थळं कात टाकणार; परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम...दिलीप कांबळे

मावळ: लोणावळ्यातील (Lonavla) पर्यटन ठिकाणी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr, Rajesh Deshmukh), मावळ आमदार सुनील शेळके (MLA Sunil Patil) आणि पुणे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी लोणावळा परिसरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. पर्यटनस्थळांवरील (Tourist places) समस्या, सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला. (Tourist places in Maval will be developed; Activities to attract foreign tourists)

हे देखील पहा -

पर्यटकांचे आकर्षण असलेले राजमाची गार्डन, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, वाघजाई पॉईंट, भुशी डॅम परिसरात पाहणी दौरा करण्यात आला. पर्यटकांनी नेहमीच गजबजून लोणावळा परिसर फुलतो. मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक विदेशी पाहुणे यांना उत्तम सुविधा निर्माण झाल्यातर पर्यटनाला (Tourism) अजून चांगली चालना मिळेल. कोरोना काळात गेली दीड वर्ष पर्यटनावर बंदी होती, त्यामुळे लोणावळ्यातील व्यापार ठप्प झाले होते.

तर पर्यटकांना विविध पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी झीप लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रोप वे असे साहसी प्रकल्प राबविण्याचा मानस राज्य सरकारने राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही महत्त्वाचे. रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. ही पर्यटन स्थळे आता फक्त सेल्फी पॉईंटसाठी न राहता याठिकाणी वॉटर लाईट शो, लहान मुलांसाठी खेळणी, म्युझिकल रेन डान्स इ. प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.

मावळातील पर्यटन स्थळं कात टाकणार; परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम...
स्वच्छ भारत सर्वेक्षण: लोणावळा नगरपरिषद देशातून दुसरी! नागरिकांचा जल्लोष...

भविष्यातील पर्यटन विचारात घेता असे विविध प्रकल्प याठिकाणी राबवावे लागतील. पर्यटन वाढ झाल्यास त्याचा फायदा स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक, टपरीधारक, हॉटेल्स यांना नक्कीच होईल. या पर्यटनस्थळांवरील पाहणी करत असताना स्थानिक व्यवसायिकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार सुनील शेळके, मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी संवाद साधला.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com