
मुंबई : अनेकांना प्रवासाची खूप आवड असते. पण कधी कामानिमित्त किंवा घरच्या जबाबदारीमुळे फिरायला जायला मिळत नाही. पण काही लोकांना मित्र किंवा कुटूंबासोबत प्रवास करायला आवडतो, तर काही लोकांना एकट्याने प्रवास करायला आवडतो. तुम्हालाही फिरायला जायचे असेल, तर काही सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स तुमचा प्रवास सुलभ आणि आनंददायी करू शकतात.
हे देखील पहा -
पहिल्यांदा फिरायला जाणार आहात तर या गोष्टींची काळजी घ्या.
१. जर तुम्ही पहिल्यांदा एकटे किंवा मित्रांसोबत प्रवास (Travel) करण्याचा विचार करत असाल तर फिरायचे नियोजन करण्यापूर्वी तुम्हाला सहज फिरता येईल अशी जागा निवडा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पहिल्यांदाच एकट्याने प्रवास करत असाल तर जवळच्या ठिकाणाहून तुमचा प्रवास सुरू करा.
२. भेट देण्याचे ठिकाण निवडल्यानंतर, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बजेटचे नियोजन करणे. तुम्ही तुमच्या प्रवासाचे बजेट अगोदरच ठरवा ज्यामुळे तुम्हाला शेवटच्या क्षणी त्रास सहन करावा लागणार नाही. यामध्ये वाहतूक, राहण्याची सोय, खाद्यपदार्थ आणि खरेदी आदींचा आगाऊ समावेश करावा. जर तुमचे बजेट कमी असेल आणि अंदाज जास्त येत असेल तर त्यानुसार गोष्टींचे नियोजन करा. महागड्या हॉटेलांऐवजी वसतिगृहांप्रमाणे स्वस्त पण सुरक्षित हॉटेल्स बुक करा. खरेदीची (Shopping) यादी कमी करा.
३. तुमच्या प्रवासाचा अनुभव मोबाईल (Mobile)मध्ये कॅप्चर करायचा असेल, तर तुमचा फोन फुल चार्ज करा. पॉवर बँक आणि चार्जर सोबत ठेवायला विसरू नका.
४. प्रवास सुलभ करण्यासाठी, फक्त त्या वस्तू बॅगमध्ये ठेवा, ज्या प्रवासात गरजेच्या आहेत. आपले सामान सहज घेऊन जाता येईल अशा बॅगमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त आपले ओळखपत्र, औषधे, तिकिटे इत्यादी सोबत ठेवायला विसरू नका.
५. ट्रेन, फ्लाइट किंवा बसची तिकिटे याशिवाय हॉटेलमधील रूम आगाऊ बुक करा. बुकिंग करण्यापूर्वी लोकेशन पुन्हा एकदा तपासण्याला विसरू नका.
फिरायची प्लानिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या आणि प्रवासाचा आनंद लुटा.
Edited By - Komal Damudre
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.