Travel Tips : विमान प्रवासादरम्यान तुमचे मुलही रडू लागते ? तर, 'या' टिप्स फॉलो करा

एकतर मुल सतत काही तरी मागत राहाते किंवा ते रडत तरी असते अशावेळी नेमके काय करावे हे कळत नाही.
Travel Tips
Travel TipsSaam Tv

Travel Tips : लहान मुलांसोबत प्रवास करताना बरेचदा पालकांना नाकी नऊ येते. एकतर मुल सतत काही तरी मागत राहाते किंवा ते रडत तरी असते अशावेळी नेमके काय करावे हे कळत नाही. बहुतेक लोक प्रवास करताना कधी आपण पोहोचतोय अशा परिस्थितीमध्ये असतात किंवा काही लोक त्या प्रवासाचा आनंद घेतात.

लहान मुलांच्या पालकांसाठी प्रवास हा अनेकदा डोकेदुखी ठरतो आणि याचे मुख्य कारण म्हणजे मुलांची गुंडगिरी. मुलाच्या सततच्या रडण्यामुळे अनेक वेळा असे पालक प्रवासात जास्त अस्वस्थ होतात. तुम्ही देखील अशा पालकांपैकी एक आहात, ज्यांना विमान प्रवासादरम्यान या समस्येचा सामना करावा लागतो. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रभावी टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने फ्लाइटचा प्रवास (Travel) सोपा करता येईल.

Travel Tips
Solo Travel Trip : बजेटमध्ये प्लान करा, सोलो ट्रिप !

1. खेळणी उपयोगी पडतील

फ्लाइटमध्ये मुलाचे मनोरंजन करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. अशा परिस्थितीत, खेळण्यांची कल्पना सर्वोत्तम होईल, कारण खेळणी ही मुलांची सर्वकालीन आवडती वस्तू आहे. आपण त्यांना दिलेले खेळणे मुलाचे आवडते असेल तर ते काही प्रमाणात शांत राहू शकतात.

2. टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान हे करा

जर तुमचे बाळ विमान टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान तेव्हा रडत असेल तर त्या काळात त्याला खायला द्या. स्तनपान करताना बाळाला कानात वेदना जाणवणार नाहीत आणि रडणारही नाहीत. वास्तविक, विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगमध्ये खूप आवाज असतो आणि लहान मुले या परिस्थितीत स्वतःला सामान्य ठेवू शकत नाहीत.

3. यावेळी विमानाने प्रवास करा

पालकांना (Parents) मुलाची झोपण्याची वेळ चांगली माहित असते. तुमचे मूल गोंगाट किंवा गर्दी पाहून घाबरू शकतात, अशा परिस्थितीत, जेव्हा त्याची झोपायची वेळ असेल तेव्हा प्रवास करण्याचे विचार करा. जर प्रवास लहान असेल तर तो मुलाच्या झोपेत पूर्ण होऊ शकतो

4. शांत रहा

रडण्याची समस्या केवळ मुलालाच नाही तर त्याच्या पालकांना आणि आसपासच्या प्रवाशांनाही त्रास देते. अशा परिस्थितीत पालक चिडतात आणि त्यामुळे मुले अधिक रडायला लागतात. या स्थितीत, प्रथम आपण स्वत: ला शांत केले पाहिजे आणि नंतर मुलाला शांत करण्याचे मार्ग शोधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com