Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याची रेसिपी बनवून बघा?

26 जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.
Republic Day 2023
Republic Day 2023 Saam Tv

Republic Day 2023 : 26 जानेवारी हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन आपण खूप उत्साहात साजरा करतो. हा दिवस लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात सगळीकडे सजावट केलेले दिसते.

केशरी, पांढरा आणि हिरवा या तीन रंगापासून काहीतरी कलाकृती केलेली दिसत असते. तुम्ही सुद्धा किचन (Kitchen) मध्ये या रंगांपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकता आणि हा दिवस (Day) साजरा करू शकता. चला तर मग त्या रेसिपी बद्दल माहिती जाणून घेऊ.

तिरंगा खमण ढोकळा -

तुम्ही ढोकळा बनवला असणारच पण या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ढोकळा तिरंग्याच्या रंगात बनवणार आहोत तर त्याबद्दलचे साहित्य पुढील प्रमाणे दिले आहे.

साहित्य-

  • केशरी रंगासाठी 6 चमचे बेसन, 1/4 कप दही, 2 गाजर प्युरी, 1/2 टीस्पून लिंबूचा रस, 1/2 टीस्पून साखर, 1/2 टीस्पून तेल, 1/2 टीस्पून इनो, 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 2 चमचे पाणी

  • हिरवा रंग करण्यासाठी- 6 चमचे बेसन, 1/4 कप दही, 2 चमचे पालक प्युरी, लिंबाचा रस, 1/2 टीस्पून साखर, 1/2 टीस्पून तेल, 1/2 टीस्पून इनो, 1 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 2 चमचे पाणी,

  • टेम्परिंगसाठी - 1/2 टीस्पून तेल, 2-3 कढीपत्ता, 1/2 मोहरी, 1/2 जिरे, 2 हिरवी मिरची, 1 हिरवे धने, 1/2 कप पाणी

Republic Day 2023
Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यात काय फरक आहे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

बनवण्याची पद्धत -

सर्वप्रथम स्टीमर मध्ये पाणी टाकून गरम करा. ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा तयार कराल त्यावर थोडे तेल लावा आता तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये हिरवे पांढरे आणि केशरी घटक स्वतंत्रपणे तयार करा.

ग्रीस केलेल्या भांड्यात केशरी रंगाचे पीठ घाला आणि चांगले पसरवा आता त्यावर पांढरे आणि नंतर हिरवे पीठ घालून चांगले सेट करून घ्या ते किमान 20 ते 30 मिनिटे वाफवून घेतल्यानंतर टूथपेने ढोकळा तयार झाला आहे की नाही ते एकदा चेक करून बघा.

ढोकळा तयार झाल्यावर गॅस बंद करून थोडा वेळ थंड होण्यासाठी सोडून द्या. आता टेम्परिंग साठी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे टाकून फोडणी द्या. त्यानंतर कढीपत्ता हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद फिरवून घ्या.

त्यात पाणी टाकून दोन-तीन मिनिटे चांगले शिजवून घ्या आता ढोकळ्यावर ओता आणि ढोकळ्याच्या समान भाग करा आणि त्यानंतर हिरव्या कोथिंबीरचा पानांनी सजवून सर्व्ह करून चटणी सोबत किंवा असेही तुम्ही खाऊ शकता.

Republic Day 2023
Happy 74th Republic Day 2023 Wishes : आपल्या प्रियजनांना द्या प्रजासत्ताक दिनाच्या 'या' खास शुभेच्छा

तिरंगा सँडविच बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे -

साहित्य -

6 ब्रेडचे तुकडे, लोणी, 2 चमचे पुदिन्याची चटणी, 1/2 किसलेला पनीर, 1 लहान गाजर, 2 अंड्यातील बल्क, चवीनुसार मीठ, 1 लहान काकडी, 1 छोटा कांदा, 1 चीज क्यूब

बनवण्याची पद्धत -

  • सर्वात आधी गाजर काकडी आणि कांदे धुवून स्वच्छ करून घ्या त्यानंतर गाजर किसून, काकडीचे अगदी पातळ काप करून ठेवा कांदा पातळ रिंगामध्ये कापून बाजूला ठेवा.

  • आता ब्रेडच्या कडा कापून घ्या ब्रेडच्या स्लाईस मध्ये बटर लावा एका स्लाइस वर हिरवी चटणी आणि कांद्याच्या रिंग आणि काकडी लावा त्यावर दुसरा स्लाईस ठेवा.

  • मेवनिज आणि नंतर थोडी काकडी आणि किसलेला चीज लावा.

  • आता त्यात मीठ आणि मिरपूड शिंपडा त्यात चीज किसून घ्या आणि किसलेल्या गाजर घातल्यानंतर तिसरा स्लाईस ठेवून वरून बटर लावून बेक करा किंवा अशा प्रकारे सर्व्ह करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com