या टिप्स फॉलो करा आणि दुभंगलेल्या केसांपासून मुक्ती मिळवा..!

आपले केस निरोगी आणि स्वच्छ नसतील तर त्याचा संपूर्ण परिणाम आपला लुक पूर्णपणे खराब करतो.
या टिप्स फॉलो करा आणि दुभंगलेल्या केसांपासून मुक्ती मिळवा..!
Hair care tips in Marathi, remedies for hair growth, benefits of oil for hairब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या संपूर्ण लुकमध्ये केस आपली महत्त्वाची भूमिका बजावतात. जर आपले केस निरोगी आणि स्वच्छ नसतील तर त्याचा संपूर्ण परिणाम आपला लुक (Face) पूर्णपणे खराब करतो. आरोग्याची (Health) कोणतीही समस्या आपले केस खराब करू शकते. जसे आपण आता दुभंगलेल्या केसांबद्दल जाणून घेणार आहोत, फाटा फुटणाऱ्या केसांना वेगळे समजले जाते. यासोबतच ते आपल्या केसांची वाढही थांबवतात. अशा परिस्थितीत केस कापणे एकप्रकारे आवश्यक असते. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही दुभंगलेल्या केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. (Hair care tips in Marathi)

हे देखील पहा -

या गोष्टी नक्की करुन पहा

१. तुम्हाला देखील केसांचे फाटे मुळापासून काढायचे असतील तर अशा स्थितीत खोबरेल तेलाचा वापर करा. तेल केसांच्या मूळापर्यंत लावा. यानंतर टॉवेल घेऊन गरम पाण्यात बुडवून पिळून घ्या. नंतर हा गरम टॉवेल डोक्याला पूर्णपणे गुंडाळा आणि ५ मिनिटे असेच राहू द्या. असे किमान तीन ते चार वेळा करावे. यामुळे तुमच्या केसांचे आणि स्कॅल्पचे तेल चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होईल आणि असे केल्याने तुम्हाला दुभंगलेल्या केसांपासूनही सुटका मिळेल.

२. आजकाल शॅम्पूमध्ये प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. म्हणूनच तुम्हाला तुमच्या केसांसाठी हर्बल शॅम्पू निवडावा लागेल, ज्याचा वापर करून तुमच्या केसांना निरोगी आयुष्य मिळेल. हर्बल शॅम्पूमध्ये अशी कोणतीही रसायने वापरली जात नाहीत ज्यामुळे तुमची दुभंगलेल्या केसांपासून सुटका होईल.

Hair care tips in Marathi, remedies for hair growth, benefits of oil for hair
Office tips : ऑफिसमध्ये एनर्जी टिकवायची आहे तर, सकाळी उठून हे करा..!

३. अंडी हे केसांसोबतच आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. यासोबतच, तुमचे केस दुभंगू नयेत यासाठी तुम्ही हेअर मास्क बनवून त्याचा वापर करु शकता. अंडी केसांना केवळ पोषण देत नाही तर स्‍प्लिट एन्डपासून संरक्षणही करते. अंड्यातील पिवळा बलक कंडिशनर म्हणून काम करते ज्यामुळे केस (Hair) मजबूत होतात.

४. दुभंगलेल्या केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पपईचा वापर करु शकता. यासाठी तुम्ही पपईसोबत ३ टेबलस्पून दही घ्या व ते केसांच्या टाळूवर लावा. तसेच संपूर्ण केसांनाही लावा. विशेषतः दुभंगलेल्या केसांवर आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. त्याचा चांगला परिणाम तुमच्या केसांवर होईल.

या टिप्स नक्की करा आणि दुभंगलेल्या केसांपासून सुटका मिळवा

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.