
Skin Care Tips : अनेक व्यक्ती आपल्या खराब त्वचेपासून त्रासलेले असतात. बऱ्याचदा वयानुसार कोलेजन कमी होणे, सणट्यान, डेड सेल्सची परत जमा झाल्याने होते. अशा प्रकारच्या स्किंसोबत तुम्हाला दोन हात करण्याची गरज भासणार नाही. उलट काही बेसिक गोष्टीमुळे तुम्ही तुमची स्कीन स्मुथ आणि गलोविंग बनवु शकता. आज आम्ही तुम्हाला स्कीन कशा पद्धतीने इंप्रूव केली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
कशा पद्धतीने इम्प्रुव करावी स्कीन टेक्चर -
सस्कीनसाठी जसे मॉइश्चरायझर महत्वाचे असते. तसेच स्कीनची (Skin) काळजी घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घ्यायची असेल तर सनस्क्रीन जरूर लावा. ही क्रीम सन ड्यामेजपासून वाचवते. आणि एजिंग साईन कमी करते. सोबतच चेहर्यावरील सुरकुत्यांना येण्यापासून वाचवते.
स्किनला स्मुथ आणि शायनी बनवण्यासाठी चेहरा मॉइश्चराईज करणे अत्यंत आवश्यक आहे. एक्सपर्टचं म्हणणं एकाल तर, तुम्ही दररोज आणी दिवसातून अनेक वेळा मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला संस्क्रिन अंघोळीच्या नंतर लगेचच लावायची आहे.
तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फेस ऑइलचा (Oil) वापर करत असाल तर, तुमच्या चेहऱ्यावर लवकर ग्लो येण्यास मदत होते. याचे दोन तीन थेंब चेहऱ्यावर कमाल करू शकतात. तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त कोणत्याही फेस ऑइलचा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फेस ऑईलचा वापर करून चेहऱ्यावर मसाज देखील करू शकता. असं केल्याने तुमचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थीत होते.
बऱ्याचदा फेस वॉश आणि क्लीनझरचा वापर करून सुद्धा चेहऱ्यावरील घान साफ होत नाही. अशावेळी तुम्ही टोनरचा वापर करू शकता. टोनरच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स मधिल घाण साफ होऊन चेहरा खुलून दिसेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.