तोंड आल्यास हे घरगुती उपाय करुन पहा

आपल्या शरीरातली गरमी वाढली की, आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्ररारी सुरू होतात.
home remedies for mouth ulcer in Marathi
home remedies for mouth ulcer in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या शरीरातली गरमी वाढली की, आपल्याला आरोग्याच्या अनेक तक्ररारी सुरू होतात. त्यातलाच एक तोंड येणे. तोंड आल्यानंतर आपली जीभ लालसर किंवा गालाच्या आत लहानसे फोड येऊ लागतात. (home remedies for mouth ulcer in Marathi)

हे देखील पहा -

तोंड आल्यानंतर काही खाल्ल किंवा प्यायल्याने आपल्याला त्रास जाणवू लागतो. त्यामुळे आपली सतत चिडचिड होऊ लागते. उपाशी राहिल्याने अॅसिडीटी किंवा शरीरातली उष्णता वाढू लागते. त्यामुळे आपल्याला अल्सर सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तोंड येण्याचे मुख्य कारणे हे अधिक मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने, जीवनसत्त्वांची (Vitamins) कमतरता किंवा आपल्या पचनसंस्थेत बिघाड झाल्यामुळे ही समस्या उद्भवते. तोंड आल्यानंतर काही घरगुती उपायांचा आपण अवलंब करू शकतो.

तोंड आल्यानंतर या गोष्टी करा -

१. अनियमित आणि चुकीच्या आहारामुळे पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. पोटातील उष्णता वाढते त्यामुळे तोंड येते. त्यासाठी आपले पोट साफ ठेवा.

२. तोंड आल्यानंतर चहा-कॉफी, तीव्र मसालेदार आणि तिखट पदार्थांपासून दूर राहा. पालेभाज्या, दूध, दही यांचं सेवन अधिक करा. टोमॅटोचं सेवन अधिक प्रमाणात करा. सकाळी जेवणानंतर एक-दोन केळी आणि दिवसातून दोन-तीन वेळा खोबरं खा याने फायदा होईल.

home remedies for mouth ulcer in Marathi
चुकीच्या आहारामुळे होऊ शकतात आपली हाडे कमजोर!

३. रात्री दुधात (Milk) गायीचे तूप मिसळून ते दूध प्यायल्याने आराम मिळेल तसेच कोमट पाण्यात लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास फायदा होईल.

४. कच्च्या कोथिंबीरीचे सेवन करा. चमेलीची पानं खाल्ल्याने फायदेशीर ठरते. जांभळाची पाने उकळवून त्याने गुळण्या केल्यास फायदा होईल.

५. दह्याचे सेवन करा व त्यावर पाणी पिणे किंवा चूळ भरणे टाळा. छोटा हिरड्याची पूड तोंड आलेल्या ठिकाणी लावण्याने फायदा होतो.

६. तुळशीची पाने चावल्याने फायदा होतो. टोमॅटोचा रसाने चूळ भरल्यास तोंड, ओठ तसेच जिभेला आलेले छाले निघून जातात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com