TVS Apache RTR 310: फक्त २ सेकंदात ४५ किलोमीटर प्रतितास वेग, TVSची लाखमोलाची बाइक लाँच

TVS Apache RTR 310 launch :टीव्हीएसची 'अपाची आरटीआर ३१० ' ही बाइक नुकतीच लाँच झालीय.
TVS Apache RTR 310
TVS Apache RTR 310Saam Tv

TVS Apache RTR 310 Features and Prize

बाइक सुरू केली की, फक्त २ सेकंदात प्रतितास ४५ किलोमीटरचा वेग पकडते. विश्वास बसणार नाही. पण खरंय. टीव्हीएसची 'अपाची आरटीआर ३१० ' ही बाइक नुकतीच लाँच झालीय. तिची विक्रीदेखील सुरू झाली आहे. आता या बाइकमध्ये कोणकोणते फीचर्स आणि या बाइकची किंमत किती आहे हे आपण जाणून घेऊयात.

टीव्हीएस मोटर्स ही दुचाकी निर्मिती व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीने त्यांची बहुप्रतीक्षीत, बहुचर्चित बाईक TVS Apache RTR 310 भारतात लाँच केली आहे. ही बाइक नवीन लूकसह बाजारात उपलब्ध झाली आहे.

TVS Apache RTR 310
Morning Fatigue Can Be Serious Symptoms : दररोज सकाळी बेडवरून उठता येत नाहीये? असू शकतात या आजारांची लक्षणं, हे टिप्स फॉलो करा...

स्पोर्टी लूक, जबरदस्त फिचर्स आणि अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीसह ही बाइक बाजारात सज्ज झाली आहे. या बाईकची किंमत सुमारे 2.34 लाखांपासून सुरू झाली आहे. या बाइकमध्ये नवीन फीचर्स समाविष्ट केले आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोणत्याही बाइकमध्ये असे फीचर्स नाहीत. Apache RR 310 च्या तुलनेत ही बाइक २९,००० रुपयांनी स्वस्त आहे. या बाइकमध्ये दमदार इंजिन आहे.

पावर आणि परफॉर्मन्स

नवीन फ्रेमवर तयार केलेल्या या बाइकमध्ये 312 सीसी क्षमतेचे लिक्वीड कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन लावण्यात आले आहे. हे तुम्हाला BMW 310 मध्येही मिळते. हे इंजिन 35.6hp पावर आणि 28.7Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. ही एक परफॉर्मन्स बाइक असल्याने असिस्ट आणि क्लचदेखील मिळतो. त्याचा टॉप स्पीड 150 किमी/तास आहे. ही बाइक फक्त दोन सेकंदात ४५. ६ किमी तासाचा वेग पकडण्यास सक्षम आहे.

TVS Apache RTR 310
Benefits Soap In Car : इवलुसा साबणाचा तुकडा घेईल कारची काळजी, फायदे वाचून थक्क व्हाल!

बॉडी, फ्रेम आणि सस्पेंशन

हलक्या वजनाच्या अॅल्युमिनियम ट्रेलिस फ्रेमवर आधारित ही दुचाकी स्पोर्टी लूकमध्ये बनवण्यात आली आहे. ही बाइक तरुणांना नक्कीच आवडेल. ही फ्रेम मागील भागाकडे विस्तारलेली आहे. Apache RTR 310 च्या पुढील बाजूस, कंपनीने अपसाइ़ड-डाउन फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस लाला रंगाचा मोनोशॉक सस्पेंशन सेटअप दिला आहे. या बाइकमध्ये फक्त मागील बाजूस प्रीलोड अॅडजस्टॅबिलिटीची सुविधा आहे.

टायर आणि ड्रायव्हिंग मोड

या बाइकला मागील आणि पुढील बाजूस १७ इंच ड्युअल कंपाउंड रेडियल टायर देण्यात आले आहे. या मोटरसायकलमध्ये अर्बन, रेन, स्पोर्ट ट्रॅक सुपरमोटो मोडचा समावेश आहे.

काम होईल एका स्पर्शात

Apache RTR 310 मध्ये लॅंडस्केप- ओरिएंटेड 5.0 इंच TFT टचस्क्रीन आहे, जी तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल म्हणून मिळते. ही स्क्रीन बाइकच्या संबंधित सर्व फीचर्स अपडेट करण्याची सुविधा देते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com