Uber Safety Features : Uber देणार आता हाय सिक्युरटी, 'All Ok' म्हटल्याशिवाय प्रवास सुरु होणार नाही !

उबर आपल्या प्रवाशांना नेहमीच काही खास सुविधा देत असते.
Uber Safety Features
Uber Safety Features Saam Tv

Uber Safety Features : आपला प्रवास सुखकर व्हावा व आपल्याला हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या वेळी लवकर पोहोचता यावे यासाठी काही कंपन्यांनी त्यांची Ride ही विशेष सुविधा सुरु केली. त्यातील एक Uber.

उबर आपल्या प्रवाशांना नेहमीच काही खास सुविधा देत असते. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन सध्या उबरने नवीन फीचर्स आणले आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुरक्षा (Security) देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Uber Safety Features
WhatsApp Chat Settings : WhatsApp ची 'ही' सेटिंग ऑन करा; मिनिटांत वाचा डिलीट केलेले मेसेज !

उबेरच्या नवीन सुविधांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक चांगली सुरक्षा मिळू शकते. नवीन सुरक्षितता सुविधांमध्ये मागील सीट बेल्ट रिमाइंडर, प्रोअॅक्टिव्ह ट्रिप सोबतच SOS समाविष्ट आहे.

एवढेच नाही तर यात Ride Check 3.0 सारखे फीचर देखील जोडण्यात आले आहे. तसेच राइडमध्येच थांबवल्यास चालक आणि प्रवासी दोघांनाही संपर्क साधला जाईल. प्रवाशाने 'ऑल इज वेल' असे सांगितले तरच पुढे प्रवास पुढे जाऊ शकेल. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा 24×7 साठी असेल.

कोणत्याही तक्रारीसाठी कॉल सुविधा उपलब्ध

  • कोणत्याही तक्रारीसाठी चोवीस तास मदत उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

  • कोणत्याही मदतीसाठी प्रवासी 8800688666 वर कॉल करू शकतात.

  • यामध्ये यूजर्सना 24×7 मदत मिळेल.

  • कंपनीचा (Company) दावा आहे की यापैकी 99 टक्के इनकमिंग कॉल्सचे उत्तर पहिल्या 30 सेकंदात दिले जाते.

SOS ची सुविधा

  • कोणतीही राइड सुरू होण्यापूर्वी, पुश नोटिफिकेशनसह ऑडिओ रिअर सीट बेल्ट रिमाइंडर ड्रायव्हर आणि रायडर दोघांच्याही फोनवर जाईल.

  • सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी Uber ने स्थानिक पोलिसांसोबत लाइव्ह लोकेशन आणि माहिती शेअर करण्यासाठी SOS देखील सुरू केला आहे.

  • उबरने ही सुविधा यापूर्वीच हैदराबादमध्ये उपलब्ध करून दिली आहे. आता ही सुविधा मोठ्या मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे.

  • उबरने आपले सेफ्टी टूलकिट अशा प्रकारे डिझाइन केले आहे की रायडर्सना आवश्यकतेनुसार मदत सहज मिळू शकते.

  • सेफ्टी टूलकिटमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे तक्रारी आणि त्यांची हाताळणी सुलभ होईल.

  • Uber ची 24×7 सेवा 8800688666 वर उपलब्ध असेल. कॉल 30 सेकंदात कनेक्ट होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com