
UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २०२४ मध्ये UGC NET ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १० जून पासून सुरु होणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी UGC NET परीक्षेच्या तारीखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार UGC NET 2024 परीक्षा १० जून ते २१ जून २०२४ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत त्यांनी nta.ac.in वर अधिक तपशील पाहू शकता.
यूजीसी नेट परीक्षा साधरणत: वर्षातून दोनदा घेतली जाते. जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. याची तारीख आणि वेळापत्रक (Time table) लवकरच जाहीर करण्यात येईल. परीक्षेच्या आणखी माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
NTA देशभरातील निवडक शहरांमध्ये 83 विषयांसाठी जून २०२४ मध्ये UGC NET आयोजित करेल. उमेदवार परिशिष्ट -3 मधील विषयांची यादी आणि कोड तपासू शकता. तसेच अधिकृत वेबसाइट्स UGC NET परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करु शकतात.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.