Unlucky Signs : आयुष्यात अडचणी येताय ? 'या' 7 अशुभ संकेतांवरुन ओळखा

अनेक काळापासून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही आपण खऱ्या मानतो.
Unlucky Signs
Unlucky SignsSaam Tv

Unlucky Signs : आपण एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडलो आणि मागून कोणी आवज दिला, अचानक मांजर आडवी गेली तर आपली चिडचिड होऊ लागते. अनेक काळापासून अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही आपण खऱ्या मानतो. पण त्या कितपत खऱ्या असतात हे ज्याचे त्याला ठाऊक असते.

सामान्य माणसाला येणारी शिंका असो वा कुत्र्याचे किंवा मांजराचे रडणे असो, देशातच नाही तर परदेशातही शुभ-अशुभ अशा सर्व प्रकारच्या समजुती आहेत. अशा घटनांमागील लपलेले संकेत भारतात शकुन शास्त्राच्या माध्यमातून सहज कळू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की जिथे एकाच प्राणी किंवा पक्ष्याशी संबंधित एक चिन्ह शुभ असते, तर दुसरे चिन्ह तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया, जीवनाशी संबंधित त्या 7 चिन्हांबद्दल जे भविष्यात येणा-या मोठ्या धोक्यांचा आपल्या इशारा देतात.

Unlucky Signs
Saturday Tips: शनिवारी या गोष्टी दृष्टीस पडणे असते शुभ, समजून जा 'अच्छे दिन' येणार

1. घुबड

हिंदू धर्मात, घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते, परंतु घराभोवती याचे फिरणे अशुभ असते. असे मानले जाते की, जर एखाद्या घरावर घुबड बसू लागले तर ते घर लवकरच उद्ध्वस्त होते. तसेच घराच्या छतावर बसून घुबड रडत असेल तर समजावे की घरावर मोठे संकट येणार आहे.

2. कावळा

घराच्या छतावर किंवा कावळ्याला पाहुण्यांच्या आगमनाचे लक्षण मानले जाते. त्याच कावळ्याशी काही अशुभ संकेतही जोडले जातात. एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श केल्यावर किंवा डोक्यावर घिरट्या घालल्यानंतर तो अशुभ मानला जाते. यामुळे व्यक्तीवर काही मोठे संकट येण्याचे लक्षण मानले जाते.

3. उंदीर

हिंदू धर्मात श्री गणेशाची स्वारी मानला जाणारा उंदीर जर घरात एक किंवा दोन असेल तर तो शुभ मानला जातो, परंतु जर अचानक त्यांची संख्या घरात वाढली आणि ते वस्तू कुरतडू लागले. तर समजावे की भविष्यात आपल्यावर खूप मोठे आर्थिक नुकसाना सामोरे जावे लागू शकते.

4. दूध

ज्योतिषशास्त्रात दूध (Milk) हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की स्वयंपाकघरातील चुलीवर उकळलेले दूध पुन्हा पुन्हा जमिनीवर पडल्यास त्या व्यक्तीला चंद्राशी संबंधित दोषांचा त्रास होतो आणि त्या घरात राहणार्‍या लोकांचे मन नेहमी अस्वस्थ असते. चुलीवर दूध सांडल्याने त्या घरातील लोकांमध्ये भांडणे होतात असाही समज आहे.

Unlucky Signs
Saturday Tips: शनिवारी फक्त 'हे' एक काम करा, सर्व संकटं दूर होतील!

5. कुत्रा

हिंदू धर्मात कुत्र्याला भगवान भैरवाचे वाहन मानले जाते. घराचे रक्षण करणार्‍या कुत्र्याबद्दल अनेक अशुभ आणि वाईट चिन्हे सांगितली गेली आहेत. जर तुमच्या घराजवळ कुत्रा रडायला लागला तर समजावे की काही मोठी आपत्ती येणार आहे. त्याचप्रमाणे कुत्र्याने तुमच्या घरातून एखादी वस्तू उचलून नेणे फारच अशुभ मानले जाते.

6. मांजर

कुत्र्याप्रमाणे घरात किंवा घराभोवती मांजरीचे (Cat) रडणे हे अशुभ मानले जाते. त्याचप्रमाणे घरात दोन मांजरी येणे आणि एकमेकांशी भांडणे हे देखील मोठ्या संकटाचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या कामासाठी जात असताना काळ्या मांजरेने रस्ता ओलांडला तर ते अशुभ मानले जाते.

7. शिंकणे

केवळ भारतातच नाही तर परदेशातही शिंका येणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीला काही महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना मागून शिंक येत असेल किंवा भुंकले तर ते फारच अशुभ असते. मात्र, एकाच व्यक्तीला सलग दोनदा शिंक आल्यास ते शुभ मानले जाते. माणसांप्रमाणेच कुत्रा आणि मांजर यांच्या शिंकणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com