फळांच्या व भाजीच्या सालीचा उपयोग अशा पध्दतीने करा

फळांच्या व भाज्याच्या सालीचा उपयोग करण्यासाठी काही टिप्स
फळांच्या व भाजीच्या सालीचा उपयोग अशा पध्दतीने करा
peels uses, Kitchen tips and tricks marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपण बऱ्याचदा आठवड्याभराची भाजी व फळांची खरेदी करतो. ती साली सकट साफ करुन फ्रीजमध्ये ठेवतो. पण त्यांच्या सालीला आपण टाकून देतो (Kitchen tips and tricks)

हे देखील पहा -

अनेक वेळा भाज्या (Vegetable) व फळे (Fruit) सोलल्यानंतरच आपल्याला खायला आवडतात. त्याची साले आपण फेकून देतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सालींचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा हे माहित नाही. सालीचा उपयोग कसा होते हे जाणून घेऊया.

असा करा सालींचा उपयोग

१. लिंबाची साल फेकून न देता त्याचा वापर आपण सिंक साफ करण्यासाठी करु शकतो. लिंबाच्या सालीने सिंक मधली घाण साफ होईल व वासही निघून जाईल.

peels uses, Kitchen tips and tricks marathi
छोट्या-छोट्या चुकांमुळे होतो पिग्मेंटेशनचा त्रास

२. बटाट्याची साले फेकून देण्याऐवजी आपण त्याचे क्रिस्पी चिप्स देखील बनवू शकतो. यासाठी साल नीट स्वच्छ करून तेलात तळून घ्या आणि वर चाट मसाला किंवा काळे मीठ टाकून सर्व्ह करा.

३. केळीची साल फेकून देण्याऐवजी आपण त्याचा खत म्हणून वापरू शकतो. यासाठी केळीच्या सालीचे छोटे तुकडे करा. काही वेळ उन्हात सुकवून ते मातीत चांगले मिसळा. झाडांना खत मिळेल.

४. फळे किंवा भाज्यांची साल फेकून देण्याऐवजी आपण कीटकनाशक फवारणी देखील बनवू शकतो. यासाठी पाण्यात लिंबू किंवा संत्र्याची साल उकळवा आणि पाणी गाळून त्यात बेकिंग सोडा टाकून मिक्स करा.

५. आपण संत्र्याच्या सालीचे स्क्रब बनवू शकतो. यासाठी साल सुकवून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. या मिश्रणात मध, दही, मुलतानी माती आणि गुलाबजल मिसळवून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होईल.

६. अंघोळीसाठी आपण लिंबाची साल आपण वापरु शकतो. अंघोळीच्या काही तासा आधी पाण्यात लिंबाची साल टाकून त्यांने अंघोळ केल्यास खाज सुटणे, जळजळ किंवा दुर्गंधीपासून सुटका होईल.

७. कांदा, आले, लिंबू किंवा संत्र्याच्या मदतीने ड्रेन फ्लायच्या समस्येवरही मात करता येते. यासाठी पाण्यात ही सगळी साल टाकून चांगले उकळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. या मिश्रणात बेकिंग सोडा किंवा व्हिनेगर घालून चांगले मिसळा.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com