Child Care Tips : मुलांच्या हेल्दी स्लीपिंग पॅटर्नसाठी वापरा 'या' टिप्स !

लहान मुलांबद्दल सांगायचं झालं तर, व्यवस्थीत झोप न झाल्यामुळे ते चिडचिड करतात.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv

Child Care Tips : लहान मुलं असो किंवा मोठं माणूस योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर, पूर्ण दिवसभर चिडचिड होणे आणि आरोग्य धोक्यात येणे या गोष्टी होतच असतात.

लहान मुलांबद्दल सांगायचं झालं तर, व्यवस्थीत झोप न झाल्यामुळे ते चिडचिड करतात. लहान मुलांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगली झोप न झाल्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.

Child Care Tips
Child Care Tips : मुलांची हाडे सतत दुखताय? असू शकते 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता, वेळीच आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

अध्ययनानुसार ज्या लहान मुलांना (Kids) पर्याप्त प्रमाणात झोप मिळत नाही, त्यांना व्यवहार आणि काही गोष्टी शिकण्यासाठी वेळ (Time) लागतो. अशाने लहान मुलांना नवीन गोष्टी शिकायला अडचण निर्माण होते. जी काही वर्षांपर्यंत राहू शकते. आशातच तुमच्या मुलांचे स्लीपिंग पॅटर्न चांगले राहावे म्हणून आम्ही तुम्हाला काही गरजेच्या टिप्स सांगणार आहोत.

लहान मुलांच्या चांगल्या झोपेसाठी या ट्रिक्स वापरा :

1. मीलचा प्लॅन करा :

तुम्हाला तुमच्या मुलाच्या चांगल्या स्लीपिंग पॅटर्नसाठी एक चांगला मिल प्लॅन तयार करायला हवा. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाला झोपवण्याआधी पोट भरून खाऊ घातले पाहिजे. कारण की झोपायच्या वेळी तुमच्या लहान मुलाची भुकेमुळे झोप खराब होणार नाही.

Child Care Tips
Child Care Tipscanva

2. झोपायची वेळ ठरवा :

झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुमच्या लहान मुलाच्या झोपेची वेळ निश्चित करा.

Child Care Tips
Child Care Tips : मुलांच्या वागण्यातील 'या' 7 लक्षणांकडे कधीही करू नका दुर्लक्ष

3. आवाज करणाऱ्या गोष्टी लांब ठेवा :

तुमचे लहान मुलं ज्या रूममध्ये झोपते तिथे टीव्ही, म्युझिक सिस्टम यांसारख्या गोष्टी लांब ठेवा. त्याचबरोबर लहान बाळ झोपले असेल तर, त्याचा आसपास मोबाईल (Mobile) फोन ठेवू नका. लहान बाळ (Baby) जेव्हा झोपले असेल तेव्हा त्याच्या रूममध्ये शांतता असायला हवी.

4. झोपायच्या आधी डायपर घाला :

लहान बाळांना नेहमी चांगल्या क्वालिटीचे डायपर घालायला हवे, कारण की झोपेच्या वेळी कमीत कमी आठ तास बाळाची लघवी डायपर सोकुन घेईल आणि लहान बाळाला लघवीमुळे ओले वाटणार नाही. ओल्यापणामुळे लहान बाळाला थंडी वाजू शकते. यामुळे त्यांची झोप तुटेल आणि बाळाला दाणे आणि खाजेसारख्या समस्या उद्भवतील.

5. रूममध्ये उजेड नसावा :

लहान बाळांच्या रूममध्ये सामान्य तापमानासह अंधार ठेवा. अंधार झोपेचे निगडित हार्मोन मेलाटोनिनला वाढवण्यास मदत करते. हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला लवकर आणि चांगली झोप येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com