
Skin Care: व्यस्त जीवनशैलीमुळे खूप लोक योग्य आहार घेत नाही. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात परिणाम तुमच्या त्वचेवर होतो जर आपण योग्य आहार घेतला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही, त्वचेच्या समस्या होत नाही आपण नेहमी निरोगी राहतो आणि आपली त्वचा टवटवीत राहते.
चिंचेच्या लगद्यामध्ये पोषक तत्वे असतात जे त्वचेला एकस्फोलिएट करण्यासाठी मदत करते त्यामुळे त्वचेत सुधारणा होते आणि त्वचा पूर्वीपेक्षा अधिक चांगली दिसते. चिंचे मध्ये विटामिन सी असते जे चेहऱ्याचा रंग निखळण्यासाठी कार्य करते. चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी त्यांच्यापासून बनवलेल्या मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक वापरून पहा.
चिंच आणि मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य -
चिंचेचा कोळा – २ चमचा
मुलतानी माती – १ चमचा
एलोवेरा जेल – १ चमचा
मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक बनवण्याची पद्धत खालील प्रमाणे -
हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंचेचा कोळ दोन ते तीन चमचे पाण्यात विरघळून ते पाणी गाळून घ्या.आता त्या चिंचेच्या पाण्यात मुलतानी माती, एलोवेरा जेल चांगले एकजीव करून बाजूला ठेवून द्या.
तयार फेस पॅक वापरन्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि हा फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या साधारणपणे 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर राहू द्या फेस पॅक सुकून चांगले कडकड होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. फेस पॅक सुकल्याने चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. या फेस पॅक चा वापर केल्याने तुम्हाला त्वचेवर हळूहळू फरक जाणवेल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.